या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ बृहद्योगवासिष्ठसार. त्याच्या अस्तित्वामुळेच हे त्रिभुवनरूपी मृगजळ प्रवृत्त होते. मनोरूपाने स्पदन पावणाऱ्या त्याच्या ठायींच ही सर्व जगत्-लक्ष्मी उदय पावते. जळके कोलीत फिरवू लागले असता जशा वर्तुलादि आकृति दिसतात त्याप्रमाणे त्याच्या ठायीं हे जग आहे. सृष्टीस निर्माण करणे, तिचा सहार करणे इत्यादि सर्व खेळ त्या स्पदास्पदात्मक व व्यापक महादेवाचाच आहे. पण त्याचे पारमार्थिक रूप निर्मल व अक्षय्य आहे. सत्ता हेच त्याचे स्वरूप आहे. पण व्यवहारांत " त्याची सत्ता" असे ह्मणून ती त्याच्याहून भिन्न आहे, असे समजतात. ज्ञानी लोक तो सदा जागाच आहे, असे समजतात, अज्ञ तो निजला आहे, असे ह्मणतात व मुक्तास तो केव्हाही व कोठेही निजलेला नाही व जागाही नाही असे वाटते. अस्पंद अवस्थेत तो शिव ( कल्याणरूप ) व शातरूप असतो. पण स्पदावस्थेत त्रिभुवन- मय होतो. ह्मणूनच त्यास वर स्पदास्पदात्मक झटले आहे. पुष्पामध्ये सुवास हे सार असते त्याप्रमाणे सर्व नाशवत पदार्थामध्ये तो सार आहे. त्यामुळे त्या पदार्थाबरोबर तो नाश पावत नाही. आपल्याला प्रतिक्षणी जे अनेक वस्तूचे प्रत्यक्षज्ञान होत असते त्यात ज्ञानरूपाने तोच असतो. पण वस्त्राच्या वर्णाप्रमाणे तो कधीही दिसत नाही. ह्मणजेच तो बाह्य इंद्रियाचा विषय होत नाही. त्याला वागिद्रिय नसल्यामुळे तो मुक्यासारिखा असतो खरा, पण कोणत्याही वाणीची प्रवृत्ति त्याच्याच मुळे होत अस- ल्यामुळे तो अमूक आहे. त्याच्या ठिकाणी मनन हा विकार नसल्यामुळे तो पाषाणासारिखा जड आहे, असे वाटते पण मनामध्ये मनन करण्याची शक्ति त्याच्यामुळेच येते. तो वस्तुतः नित्यतृप्त असूनही भोक्ता होतो, क्रियाशून्य असूनही कर्ता बनतो व अवयवरहित असूनही अनेक नेत्रादि अवयवानी युक्त होतो. ह्मणूनच त्यास सहस्रनयन, सहस्र- शीर्षा, सहस्रपाद, अनेक बाहूदर-वक्त्र इत्यादि नांवें श्रुति-स्मृतींतून दिली आहेत. तो कोठेही नाही, पण सर्वव्यापी आहे. त्याला इदिय. पल नाही. पण सर्व इशद्रयांच्या क्रिया त्याच्यामुळेच होतात. मनन न कर प्या त्याच्यामुळेच ह्या जगत्कल्पना झाल्या आहेत. त्याच्या अज्ञाना 'च या ससाराची भीति वाटते. पण त्याचे दर्शन झाले असता सर्व व आशा पळून जातात. दीप असला तरच जशा नटांच्या हावभा. क्रिया चालतात त्याप्रमाणे या अपरिच्छिन्न ( मर्यादाशून्य ) स्वय