या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११. १४५ समजला पाहिजे. कारण असत्-वस्तूला सद्वस्तूचा दृष्टात जरी देता न आला तरी दुसऱ्या असत्-वस्तूचाच दृष्टात देता येणे शक्य आहे. आता प्रत्यक्ष दिसणाऱ्या या व्यवस्थित जगाला असत् कसे ह्मणावें झणून तूं ह्मणशील; (कारण ते सत्य आहे, असे समजणारास नेहमी हीच मोठी भीति असते,) तर सागतो. अज्ञान-अवस्थेत ते जरी प्रत्यक्ष दिसत असले तरी आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्यावर त्याचा बाध होत असतो व कोणत्याही वस्तूचे यथार्थ ज्ञान झाले असता त्याच्या सबधाने झालेल्या भ्रमाची निवृत्ति होणे अगदी साहजिक आहे. याविषयी अनेक दृष्टात देता येतात. त्यातील कित्येक पूर्वी दिले आहेत. तरी पण ते तुझ्या चित्तात चागले ठसावे ह्मणून पुनः देतो. सोन्याच्या कड्यात कड्याचा आकार प्रत्यक्ष दिसत असतो. पण ते कडे पृथक्-स्वसत्तेने युक्त नसते. सोन्याच्या दृष्टीने पाहिल्यास त्याचे भानच होत नाही; अर्थात् तो आकार मिथ्या ठरतो हणजे त्याचा बाध होतो. ब्रह्माच्या टायी भासणाऱ्या जगाचीही तीच स्थिति आहे. आका- शाहून शून्य ( अवकाश ) भिन्न नाही. तसेच प्रत्यक्ष दिसणारेही हे जग ब्रह्माहून भिन्न नाही. काजळाहून काळेपणा भिन्न नाहीं; व बर्फाहून शैत्य निराळे नाही; त्याचप्रमाणे त्या परम पदाहून जग पृथक् नाही. शैत्य चद्र किंवा बर्फ यास जसे सोडून रहात नाही त्याप्रमाणे सृष्टि ब्रह्मास सोडून रहात नाही. माळजमिनीवर भ्रमाने भासणाऱ्या नदीत जसे पाणी नसते; किंवा नेत्र-दोषामुळे दिसणाऱ्या दुसऱ्या चद्रामध्ये वास्तविक चद्रत्व नसते त्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभवास येणारे असेही हे जग त्या शुद्ध आत्म्यामध्ये नसते. कारणाचाच सभव नसल्यामुळे उत्पत्तिसमयीच जे नसते ते वर्तमानकालीं ह्मणजे स्थितिकालीं तरी कसे असणार ? व त्याचा नाश कसा होणार ? आता कारणसभव का नाही ह्मणून ह्मणशील तर सागतो. विरुद्ध स्वभावाच्या वस्तूमध्ये परस्पर कायकारणभाव नसतो. उदाहरणार्थ-आपण प्रकाश व छाया घेऊ. या दोन्ही पदार्थाचा स्वभाव परस्पर विरुद्ध असतो. यास्तव प्रकाश छायेचे किवा छाया प्रकाशाचे कारण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे चेतन ब्रह्म जड जगाचे कारण होऊ शकत नाही. तस्मात् कारणाचा असभव असल्यामुळे या दृश्य कार्याचा असंभव होणे न्याय्यच आहे. सारांश जग हे ब्रह्माचा परिणाम आहे;