या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ह्मणजे दूध जसे दहीं होते त्याप्रमाणे ब्रह्म जग झाले आहे, असे हटल्यास कारणाचा असभव होतो आणि त्यामुळे परिणाम दृष्टया हे उत्पन्न झालें नाही, असे मान्य करावे लागते. __ आता विवर्तवादाच्या दृष्टीने पाहिल्यास विरुद्ध स्वभावाचे पदार्थ परस्पर कारण होऊ शकतात. पण त्यांत कारणच कार्यरूप होत असते. यास्तव विवर्तदृष्टया कारण ब्रह्मच कार्य-जगद्रूप झाले आहे. अर्थात् त्याला पृथक् सत्ता नाही. आता तू ह्मणशील की, चेतन ब्रह्म जरी जड जगाचे परिणामी कारण होणे शक्य नसले तरी अज्ञान त्याचे परिणामी कारण आहे, असे मानावे ह्मणजे झाले. पण ते बरोबर नाही. कारण में अज्ञान जगाच्या आकाराने परिणाम पावलें आहे, असे भासते, ह्मणून तू समजतोस तेंच वृत्तिज्ञानास जगद्रूपाने भासविते. ह्मणजे ते अज्ञानच ज्ञानास जगाच्या आकाराने विवर्त करिते. कारण अज्ञानाचा परिणाम ह्मणजे ज्ञानाचा विवर्तच होय, हे स्वप्नात आपल्या चागले अनुभवास येते. कारण त्या अवस्थेत अज्ञानाचे कार्य जे अतःकरण त्याचा स्वाप्न ( स्वमांत दिसणाऱ्या ) पदार्थाप्रमाणे आकार होतो. अथवा तेच स्वतः पदार्थाकार परिणाम पावते. अतःकरणाच्या वृत्तीत चिदाभास भरलेला असतो. तो त्या वृत्तीच्या आकारास जाणतो, व त्यामुळे त्याच्यावर स्वाग्निक पदार्थाचा आरोप होतो. असा नियम आहे. जाग्रतीतही असेच होत असते. पण त्यावेळी अत.करणाच्या आकारास कारण होणारे बाह्य पदार्थ प्रत्यक्षपणे बाहेर अ- सल्यासारिखे दिसत असल्यामुळे व इद्रियादि इतर साधनाचे त्यावेळी अस्तित्व असल्यामुळे प्रत्यक्ष, अनुमिति इत्यादि ज्ञान हा वृत्तिज्ञानाचा विवर्त आहे, हे ध्यानात येत नाही. ___ असो; तात्पर्य स्वप्नातील जगाचा भ्रम जसा सविद्रूप असतो तसाच हा प्रपंचभ्रम ब्रह्मरूप आहे. आपणास हे जे काही दिसत आहे, म्हणजे आपणास ज्याचा ज्याचा अनुभव येत आहे ते ते सर्व सर्वदा आत्म्यामध्ये स्थित बाई यांतील काहीही कधी उत्पन्न होत नाही व नाश पावत नाही. तर जसे द्रवत्व म्हणजे जल, स्पंदन म्हणजे वायु व प्रकाश म्हणजे तेज तसेंच जग म्हणजे ब्रह्म होय. स्वप्नांत आपण एकादे नगर पाहतो. पण तें जसे स्वम पहाणान्या द्रष्ट-चैतन्याच्या बाहेर नसते तर ते त्या चैतन्याच्या