या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ११. १४७ आतच असते अथवा ते चैतन्यच नगररूप होते त्याप्रमाणे परमात्म्याचा मात्मा( स्वरूपभूत चैतन्य )च जगद्रूप भासतो. श्रीराम-~-महाराज हे दृश्यविष जर असे स्वमतुल्य मिथ्या आहे तर तें कल्पपर्यत रहाणारे आहे; त्यातील सवे व्यवहार अगदी बरोबर व निय- मितपणे चालला आहे इत्यादि अनुभव कसा येतो ? द्रष्टा (पहाणारा जीव) असला तर दृश्य असणार व ते असले तर तो असणार हे जर खरे आहे तर त्यातील कोणी तरी एक असले तरी दोघास बध होणार व एकाचा क्षय झाला की दोघे मुक्त होणार. पण तसे होणे दुर्घट आहे. कारण मूल अविद्येचा अत्यत बाध झाल्यास दृश्याचा बाध होणार. पण तिचा अत्यंत बाध होणे अशक्य आहे. त्यामुळे दृश्याचाही क्षय सभवत नाही. दृश्याच्या अस्तित्वामुळे द्रष्टाही विद्यमान असतो व त्यामुळे मोक्षाचा असंभव होतो. तुझी दृश्याचा असंभव आहे, असे म्हणता व खरोखरच तसे असल्यास द्रष्टा दृश्यस्वभावापासून मुक्त होऊ शकेल. पण ते माझ्या चित्तावर अजून आरूढ होत नाही. कारण जे उत्पन्नच झालेले नाही त्याचा अनुभव कसा येतो ? हे मला अजून समजले नाही. यास्तव दृश्याचा अत्यत असभव कसा आहे, ते मला चागले समजवून सागा. श्रीवसिष्ठ-बरें आहे, रामा, तुझ्या इच्छेप्रमाणे मी आता हे तत्त्वज्ञान तुला सागतो. तुझ्या हृदयातील हा संशयरूपी मळ थोड्याशा उपायाने नाहीसा होणार नाही. यास्तव मी आता व्यावहारिक गोष्टीच्या द्वारा हे परम तत्त्व तुझ्या चित्तांत दृढ करण्याचा प्रयत्न करितो. अश्रद्धा, संशय, अज्ञान, विपरीत ग्रह, अशुद्ध सस्कार इत्यादि दोषांमुळे तत्त्वज्ञान एकाएकी चित्तावर आरूढ होत नाही. तूं पूर्ण विरक्त व परम बुद्धिमान् आहेस. तरी तुला हे दोष सोडीत नाहीत. मग बिचाऱ्या विषयासक्त व पापाचरणामुळे बुद्धिहीन झालेल्या पुरुषास ते पशुवृत्ति करून टाकीत असल्यास त्यात नवल ते कोणते ? असोः ह्या जगद्रपी भ्रमाची स्थिति अत्यंत असत् आहे, हे मी तुझ्या अनुभवास आणून देणार आहे व त्याचा तुला चागला अनुभव आला ह्मणजे तू स्वरूपध्यानांत तल्लीन होऊन यदृच्छेने घडणारा हा मिथ्या व्यवहारही करशील. हे तत्त्वज्ञान रूढ झाल्यावर हे सत्य आहे, हे असत्य आहे; हे उपयोगी व त्यामुळेच ग्राह्य आहे व हे निरुपयोगी व