या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ बृहद्योगवासिष्ठसार. तेंही आकाशाप्रमाणे आपल्या कल्पनेचे अधिष्ठान जो आत्मा त्यामध्येच त्रिकाली स्थित असल्यामुळे त्याच्या सत्तेने सत्तायुक्त होते. आपल्या पृथक् सत्तेने सत्तावान् होत नाही. कारण स्वतःसिद्ध नसलेल्या वस्तूच्या योगाने जे सिद्ध करावयाचे असते ते केव्हाही स्वतः सिद्ध नसते. कारण स्वतःच जे मिथ्या ते दुसऱ्यास ह्मणजे आपल्या कार्यास सत्य कसे करील. तस्मात् ब्रह्माच्या ठिकाणी आरोपित असलेले हे भूतपचक व त्याचे कार्य स्थूल भूतपंचक ही दोन्ही चिब्रह्मरूप आहेत. त्यामुळे हा रूढ झालेला त्रिजगत्क्रमही ब्रह्मच आहे. असे जर आहे तर हे याचे कारण आहे व हे याचे कार्य आहे, असा व्यवहार कसा होतो ? ह्मणून ह्मणशील तर सागतो. या भूतपचकाचा उद्भव पूर्वीप्रमाणेच आताही होतो. त्याच्या उत्पत्तीत किंवा स्थितीत केव्हाही अतर पडत नाही. पण भूतकालिक वस्तूस वर्तमान कालीन वस्तूचे कारण व त्यास त्याचे कार्य, असे ह्मणण्याचा परिपाठ, व्यवहाराकरिता, पडला आहे साराश याप्रमाणे या सृष्टीत काहीएक उत्पन्न होत नाही कारण जर काही खरोखरच उत्पन्न झाले असते तर त्याच्या उत्पत्तीची सगति लावता आली असती पण तसे करिता येत नाही. हा जीवभावही असत् आहे स्वप्नातील नगरादिकाप्रमाणे ब्रह्माकाशसज्ञक परम-आकाशात - (परम प्रकाशात) हे जीवाकाशत्व खोटेच उद्भवले आहे. ते वस्तुतः खोटे असून खरे असल्यासारखे भासते असो, येथवर सामान्य अभिमानाच्या योगाने व प्राणसज्ञक वायूस धारण करण्याच्या सामर्थ्यामुळे ब्रह्मास समष्टि-जीवत्व कसे प्राप्त होते ते सागितले. आता विशेष अभिमानामुळे व प्रत्येक शरीरातील प्राणास धारण करण्याच्या सामर्थ्यामुळे व्यष्टि-जीवत्व कसे प्राप्त होते, ते सागतो. समाष्टि ह्मणजे समूह व व्यष्टि ह्मणजे त्यातील प्रत्येक. हिरण्यगर्भ सृष्टीत जितके ह्मणून चराचर प्राणी आहेत त्या सर्वाचे ठायी "हा मी" असा अभि. मान धरितो व प्रत्येक प्राणी आपापल्या शरीरावर मात्र “ मी " असा अभिमान ठेवितो. सृष्टीचा प्राण महा वायु आहे व प्रत्येक प्राण्याचा प्राण श्वोसोच्छासादि करताना अनुभवास येणारा व शरीराने मर्यादित होणारा वायु आहे अशा या द्विविध प्राणाम धारण करण्याचे सामर्थ्य त्या दोघामध्येही असते ह्मणून त्यास जीव असे ह्मणतात.