या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १३. १५७ कोणीही न काढलेले व रगावाचूनच विचित्र दिसणारे चित्र आहे. कोणत्याही बाह्य सामग्रीवाचून व कोणच्याही आंतर प्रयत्नावाचून उत्पन्न झालेले हे असत्य असताना सत्य असल्यासारखे वाटते. हिरण्यगर्भाचा पूर्व सस्कार, पुण्य इत्यादि सामग्रीच्या योगाने तें उत्पन्न होते, असे समजल्यास काय प्रत्यवाय आहे? ह्मणून ह्मणशील तर सागतो. ज्यावेळी महा प्रलय होतो त्यावेळी हिरण्यगर्भ व त्याच्या लोकी विशेष प्रकारची उपासना करून आलेले अतिपण्यवान् लोक मुक्त होत असतात. त्यामुळे पुढच्या सृष्टीला कारण होणारे हिरण्यगर्भाचे पूर्व सस्कारादि असणे शक्य नाही. पण जो कोणी हिरण्यगर्भाच्या पदाची मला प्राप्ति व्हावी ह्मणून सकाम उपासना करून पूर्व कल्पान्या अतीच उत्तर सृष्टीच्या आरभी हिरण्यगर्भ होण्यास योग्य झालेला असेल त्यास पढील सृष्टीच्या आरभी हिरण्यगर्भत्व प्राप्त होते. पण त्याने पूर्वी कधी सृष्टि रचलेली नसते. यास्तव त्यास पूर्व-अनुभव व अनुभवजन्य सस्कार असणे शक्य नाही. तस्मात् हे जग योग्य सामग्रीवाचूनच निर्माण झालेले आहे, असे झटल्या- वाचून गत्यतर नाही व योग्य कारणजन्य नसल्यामुळेच ते असत्य आहे. त्याच्या उत्पत्तीचा असभव आहे. जग सत्य आहे, असे ह्मणणारे कित्येक वादी आहेत, त्यातील कोणी हा प्रकृतीचा सत्य विकार आहे, असे समज- तात व कोणी ईश्वराच्या इच्छेने परमाणूचे परस्पर मिश्रण होऊन त्याचा आरभ झाला आहे, असे प्रतिपादन करितात. पण त्याच्या त्या ह्मणण्याचें परीक्षण करू लागल्यास ते फार वेळ टिकत नाही. यास्तव त्या मताचा त्याग करून वेदोक्त विवर्त-वादाचाच अगीकार केला पाहिजे. पृथ्वी, आप इत्यादि मिथ्या वस्तूंचा अनादि साक्षांस अनुभव येतो, त्यामुळे त्याच्या ठायी झालेले सस्कार प्रपचास कारण होतात, ह्मणून ह्मणावे तर साक्षीस ज्ञात होणारे स्वप्नादि मिथ्या असते, असा नियम असल्यामुळे त्याच्या संस्कारापासून होणारे जगही मिथ्या आहे, असे-आझास इष्ट आहे त- सेंच-सिद्ध होते. तस्मात् कारण काल्पनिक असल्यामुळे कार्य जगही कल्पनामय आहे. कल्पनेचा आधार मात्र सत्य आहे. नित्य व निरंजन चैतन्य (ब्रह्म ) सर्व कल्पनाचा आधार आहे. यास्तव तेच सत्य व आनद आहे. जगाच्या दृष्टीने त्याला आधार तरी ह्मणावे लागते. पण वस्तुतः ते परम प्रकाशमय सूक्ष्मतर तत्त्व अधारही नव्हे. आधार