या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५८ बृहद्योगवासिष्ठसार. आधेय, द्रष्टा, दृश्य, ब्रह्मा, ब्रह्माड, जगत्, जन इत्यादि सर्व शब्द खोटे आहेत. व्यवहाराकरिता त्याची कल्पना केलेली आहे. पण खरे पहाता एक, शात व स्थिर ब्रह्मच सर्वत्र भरून राहिले आहे. जग खरे आहे व त्यातील व्यवहार व्यवस्थितपणे चालले आहेत असे जे वाटत असते ते त्या वेळे पुरते जरी खरे असले, तरी स्वप्नातील आपल्या खरोखर भासणाऱ्या मरणाप्रमाणे, ती अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेत जाताच मिथ्या ठरते व्यावहारिक व स्वाप्निक पदार्थ सत्य आहेत, असा जो अनुभव येतो तो तरी या सत्य परमात्म्याचाच प्रभाव आहे, हे त विसरू नकोस. साराश परमात्म्याचे ठायी होणारा पहिला प्रजापति वस्तुत आकाशरूप आहे. सर्वत्र सम असणारा परमात्माच या-शून्य, प्रजापति, इत्यादिकाच्या रूपाने प्रसिद्ध होतो. तो मनोमय आहे. ह्मणजे मन हेच त्याचे शरीर आहे. त्याचे शरीर पचमहाभूतापासून झालेले नसते. त्यामुळे त्याच्या सकल्पापासून झालेले हे सर्व ब्रह्माड व त्यातील अनेक शक्ति नरशगादि इतर असत् वस्तूप्रमाणेच असत्, मिथ्या, भ्रामक व काल्प- निक आहेत १३. सर्ग १५--जीवभावामुळे ब्रह्म मर्यादित होते की काय इत्यादि शंकाचे निरसन ___ करून ब्रह्मक्याचा उपदेश करितात. श्रीवसिष्ठ-राघवा, एवढा वेळ मी जे तुला सांगितले त्यावरून जगत्, अहंता इत्यादि काहीएक दृश्य उत्पन्न झालेले नाही व तें उत्पन्न झालेले नसल्यामुळेच वस्तुतः नाही. तर जे काही आहे ते पर ब्रह्मच आहे. निश्चल समुद्रात जशी लाट येते त्याप्रमाणे पर ब्रह्माकाशांतच जीवभाव येतो व त्याचेही परमाकाशाप्रमाणेच रूप असते, इत्यादि तुला समजले असेल. ही जगद्रचना विचित्र आहे. तिच्या विचित्रतेची तुला काही कल्पना करिता यावी ह्मणून मी मागे पुष्कळ दृष्टात दिले आहेत. आद्य प्रजापतीच्या उत्पत्तींचेही युक्त कारण दिसत नाही. त्याच्या आधि- भौतिकरूपाप्रमाणेच आधिदैविकरूपही मिथ्या आहे. अर्थात हे सर्व जगजाल आरशात भासणाऱ्या भितीप्रमाणे असत्य आहे. असग व निर्विकार चैतन्याचे ठायीं, द्रष्टा, दृश्य, दर्शन; स्रष्टा, सृष्टि, सर्जन भोक्ता, भोग्य, भोग; ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान; इत्यादि सर्व त्रिपुठ्यांचा असंभव आहे. तर मग या सवे शब्दाची प्रवृत्ति कशी होते, ह्मणून ह्मणशील