या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५९ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग १४. तर सांगतों-या शब्दाचा वाच्य अर्थ व्यवहारापुरता खरा असतो. पण त्याचा लक्ष्य अर्थ हा परमात्माच आहे. त्याच्यापासूनच-एका दिव्यावर जसे अनेक दिवे लावून घ्यावे त्याप्रमाणे-ही जीवांची पंक्ति उद्भवली आहे. पण हा सर्व सकल्पाचा खेळ आहे. पहिल्या मिथ्या हिरण्यगर्भापासून जसा अत्यत शून्य विराट् उत्पन्न झाला त्या- प्रमाणे विराडात्म्यापासून व्यष्टि जीव झाला. ह्मणजे एका स्वप्नात जसे दुसरे स्वप्न पडावे तशातलाच हा एक प्रकार आहे. वृक्षापासून जशा अनेक शाखा निघतात त्याप्रमाणे विराडात्म्यापासून अनेक जीव निघाले आहेत. पण त्यास जीवाच्या उत्पत्तिसमयी सहकारी कारणाचे काहीं- एक सहाय नसते. ह्मणून त्या एकट्यासच त्या( जीवा )स उत्पन्न करावें लागते आणि वृक्ष-शाखान्यायाने ते उत्पन्न होणारे जीव त्या विराट- पुरुषाइन भिन्न नसतात. साराश ब्रह्मच आद्य प्रजापति होते; आद्य प्रजापतिच विराडात्मा होतो आणि विराडात्माच सृष्टि बनतो. जीवही तोच होय. अर्थात् परमात्माच या सर्व प्रपचरूपानें स्थित आहे. तस्मात् पृथिव्यादि आकार असत् आहेत. श्रीराम-महाराज, मला एक शंका आली आहे. आपण ह्मणता की व्यष्टि, समष्टि व त्याचे मूळ (ब्रह्म ) याचे ऐक्य आहे, व यातील मूळ मात्र सत्य असून समष्टि व व्यष्टि असत्य आहेत. पण मी यावर असे ह्मणतो की, त्या तिघाचे जर ऐक्य आहे ह्मणजे ती जर परस्पर भिन्न नाहीत तर मूळ व समष्टि यास असत्य समजून प्रत्यक्षादि प्रमाणसिद्ध व्यष्टि भागासच सत्य का मानू नये ? सेना, समाज इत्यादिकातील सम- ष्टित्व गेले तरी व्यष्टित्व रहाते, असे सेनेतील लोक आपापल्या घरी गेले असता आमच्या अनुभवास येते. यास्तव आपण कृपा करून मला अगो- दर या पुढच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मला आपल्या भाषणाचा आशय समजला आहे. पण आपला सिद्धात अधिक स्पष्ट व्हावा ह्मणून मी हे प्रश्न विचारीत आहे. हा जीव परिमित आहे ? की अनत जीवाची रास आहे ? की पर्वताप्रमाणे त्याचा एक व अनत पिंड ( गोळा ) आहे ? मेघातून जशा पावसाच्या धारा पडतात, सद्रातून जसे बिदू उसळतात किंवा. तापलेल्या लोखडाच्या गोळ्यावर घणाचे प्रहार करू लागले असतां जशा ठिणग्या उडतात त्याप्रमाणे हे अनेक क्षुद्र जीव कोणापासून उद्भ-