या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७० बृहद्योगवासिष्ठसार. विद्वान याच्या पूजनात ती तत्पर असे. स्नान दान, तप, ध्यान इत्यादि- कामध्ये ती सतत उद्यक्त राही शास्त्रात सागितल्याप्रमाणे उपवासादि अनुष्टानाचे फल मिळालेच पाहिजे, असा तिचा दृढ विश्वास असे. त्यामुळे वतानुष्टान-समयी होणारे क्लेश ती आनदाने सहन करी इकडे ती शहाणी स्त्री यथाकाल, यथाशास्त्र व यथाक्रम आपल्या पतीसही प्रसन्न करीत असे आपला उद्योग त्याला कळू नये अशीही तिने व्यवस्था केली होती. अमा, याप्रमाणे त्या सकुमार राणीने तीनशे दिवस एकसारखे कष्टकर अनुष्ठान केले दहा महिने एकसारिखी अशी कडकडीत उपासना केल्यावर त्या भगवतीम तिची दया आली व ती सरस्वती देवी तिच्या सन्मुख प्रकट होऊन तिला ह्मणाली, " वत्से, मी तुझ्या या निरतर तपाने व पतिप्रेमान सतुष्ट झाले आहे तुला जो वर पाहिजे असेल तो माग" हे ऐकून ती राज्ञा ह्मणाली-" जन्म, जरा, मरण इत्यादि दोपाचे निवारण करणारे देवि, तुझा जयजयकार असा. प्राण्याच्या हृदयातील अधकारास आपल्या अनुगम प्रभेने नष्ट करणारे माते, तुदा विजय असो हे अबे, अगे इनान, त्रिभुवनाम जन्म देणारे आई, या दीन दासीचे रक्षण कर. मला हे दान वर दे एक माझ्या पतीस माझ्या जिवतपणी मरण आल्यास त्याचा जीव या माझ्या अत पुरान्या मटपाबाहेर जाऊ नये व दुसरा, हे अचे, मी गवाटसययी जव्हा जेव्हा तुझे स्मरण करीन तेव्हा तू मला दर्शन दे " हे तिचे ह्मणणे ऐकून घेऊन नी जगन्माता "तथास्तु " असे ह्मणून समुद्रातील मोठ्या लाटेप्रमाणे गुप्त झाला. _इकटे इष्ट वर मिळाल्याकारणाने त्या लीलाराणीच्या आनंदास पारावार नाहीसा झाला पुढे पुष्कळ दिवसानी तो विषयी राजा म- रण पावला त्यामुळे तिला अतिशय दुःख झाले. प्रिय प- तीच्या मरणासारखी साध्वी स्त्रीला दुसरी कोणतीही आ- पत्ति असह्य वाटत नाही ती मुदरी मरणोन्मुख होऊन पडली. तिला देहभान नाहीसे झाले. राजाची प्राणचेष्टा होत नाही, असे पहाताच त्या भीरूची एका क्षणात अशी अवस्था झाली आहे, हे पाहून, तेथील सेवकवर्ग अतिशय भिऊन गेला. आपल्या स्वामीच्या जीविताबरोबर ह्या आपल्या गुणी स्वामिनीचाही अस्त होतो की काय । अशी त्यास शका आली. पण