या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १८. १७५ जे गुरु, श्रेष्ट ब्राह्मण, मित्र, आप्त, सबधी इत्यादि येत होते ते सर्व तिला नेहमीप्रमाणेच त्या सभेत दिसले. तेव्हा पूर्वीप्रमाणेच ते सर्व सभास्थान गजबजलेले पाहून लीलेला परम आनद झाला. राजाप्रमाणे आपले सर्व राष्टच मृत झाले की काय? अशी जी तिला शका आली होती ती निवृत्त झाली, व त्यामुळे तिच्या मुखावर समाधानाची छाया पसरली १६, १७. सर्ग १८-समावीत पाहिलेली सृष्टि व आता जाग्रतीत पाहिलेला सृष्टि या दोन्हा सारख्याच मिथ्या आहेत पण त्यास पाहणारी चेतन्य-शाक्त सत्य आह, असे या सर्गात सागतात श्रीवसिष्ठ-'माझ्या या दुखी चित्तास सभादर्शनाने तरी थोडेसे समाधान वाटले तर पहावे, ह्मणून मी तुझास बोलाविले. तरी त्याचा तुझी त्रास मानू नये,' असे नम्रपणे सुचवून लीलेने सभेचे विमर्जन केले. ती पुन आपत्या अतःपुरात गेली व पुष्पामध्ये ठविल्या आपल्या पतीच्या शवाजवळ बसून मनातल्या मनात असा विचार करू लागली अरे भगवाना, काय ही तुझी विचित्र माया आहे ? हे आमचे नगरवामी जन चिदाका- शातही मला दिसले व या आमच्या नगरातही दिसत आहेत. सभा. नगरातील गृहे, वृक्ष, वने, उपवने, पशु, पक्षी, दाम, दासी, इत्यादि जे जे येथे आहे ते ते सर्व व थोडेसे त्याहून अधिकही मला तेथे दिसले. पण यातील खरे कोणते व खोटे कोणते ? आरशात दिसणारे मुग्व खरे की, आरशाच्या बाहेर असलेले मुख खरे ? मला तर हे गोडबगाल समजत नाही आता याचा निर्णय माझ्यावर दया करणाऱ्या देवीला मी विचारिते.' असा निश्चय करून तिन ज्ञप्ति देवीचे मानसिक पूजन केले. त्याबरोबर ती देवी कुमारीचे रूप धारण करून तिच्या समोर येऊन उभी राहिली. तिचे साक्षात् दर्शन होताच लीला आदराने उठली व तिच्या चरणावर मस्तक ठेवून तिने तिला भद्रासनावर बसविले व आपण तिच्यापढे भूमीवर बसली. थोडा वेळ गेल्यावर लीला हात जोडून तिला मगाली- माते, उत्तम जन दया करण्यास योग्य असलेल्या अज्ञ बालकाचे सर्व अपराध विसरत असतात. तूच सृष्टीच्या आरभी ही मर्यादा करून ठेविली आहेस. ह्मणून वारंवार अपराध करणाऱ्या या आपल्या दीन पुत्रीचे अपराध विसरून तूं दया कर. मी काही विचारित ते साग.