या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ बृहद्योगवासिष्ठसार. तुझ्या कृपेवाचून माझे मनोरथ सफल होणार नाहीत. चिदाकाशात गेल्यावर मला एक भूताकाशाहून अति निर्मल, अखड, एकाकार, अनि- र्वचनीय, मर्यादाशून्य व निर्विकल्प ज्योति दिसली. तो जणु काय या जगास पहाण्याचा आरसाच होता, असे मला वाटते. कारण सृष्टीतील सर्व वस्तु व कालादि सर्व भाव त्यात प्रतिबिबित झाल्यासारखे दिसत होते. या त्रिभुवनाची सर्व शोभा मला त्या माझ्य चिदाकाशातही दिसली व आता बाहेरही दिसत आहे. हे प्रतिबिब आतही आहे व बाहेरही आहे. पण यातील खरे कोणते व खोटे कोणत ? बाहेर दिसणाऱ्या त्रिभुवनास कृत्रिम समजावयाचे की आतल्या ? की दोन्ही अकृत्रिम आहेत ? श्रीदेवि-मुलि, तू कृत्रिम व अकृत्रिम कशास ह्मणतेस ? झणजे कृत्रिम या शब्दाचा अर्थ तू काय समजतेस व अकृत्रिम या शब्दाचा काय समजतेस ? ते अगोदर मला साग. लीला-मी येथे बसले आहे व तूं देवी आसनावर बसली आहेस. हे खरे आहे. हा अकृत्रिम सर्ग आहे, असे मी समजते. कारण आमा उभयतास बसण्यास, बोलण्यास, उठण्यास व जाण्यास योग्य काल, योग्य देश इत्यादि येथे आहे. पण ज्या अवस्थेत मी आपल्या पतीस पाहिले ती अवस्था कृत्रिम आहे. कारण त्या अवस्थेचे स्थान अल्पहृदय असल्यामुळे त्यात दिसलेले ते सर्व पदार्थ तेथे रहाणे शक्य नाही व त्यास रहाण्यास उचित स्थान व काल नसल्यामुळे तो कृत्रिम सर्ग आहे. लहानशा आरशीत मोठा पर्वत दिसतो. पण तो पर्वत त्यात रहाणे अशक्य असल्या- मुळे व्यवहारात त्या आरशातील पर्वतास काल्पनिक, मिथ्या, कृत्रिम भ्रामक, असत् इत्यादि ह्मणत असतात. तशातला हा प्रकार आहे, असे मी समजते. श्रीदेवी-तुझ्या भाचा सर्ग ( सृष्टि ) सहेतुक आहे की निर्हेतुक आहे. ह्मणजे त्याच्या उत्पत्तीचे काही कारण आहे की, तो कारणावाचूनच उत्पन्न झाला आहे ? कारणावाचूनच उत्पन्न झाला, असे ह्मणता येत नाही. कारण कोणतीही उत्पत्ति ( कार्य ) कारणावाचून होत नसते. यास्तव तुझ्या भर्त्याच्या कृत्रिम सर्गाचेही काही कारण असलेच पाहिजे. पण ते कारण कृत्रिम आहे की अकृत्रिम अकृत्रिम आहे, असे तुला ह्मणतां येणार