या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बृहद्योगवासिष्ठसार. ज्ञातज्ञेय होत. मनाची अशी भावना होणे हेच परम शांतीचे कारण आहे. कारण आपण सर्व मानव कर्तव्य, प्राप्तव्य, व ज्ञातव्य यांकरितांच एवढी सगळी खटाटोप करीत असतो,व आमच्या मध्ये जो रजोगुण आहे तो आमास त्यात प्रवृत्त केल्यावाचून रहातच नाही. एवढ्याच करितां मुमुक्षूनी नित्य सत्त्वस्थ झाले पाहिजे. नित्य सत्त्वस्थ ह्मणजे सदा सत्त्वगुणी होऊन रहाणे. दीर्घकाल सतत अभ्यास केल्यावाचून नित्यसत्त्वस्थ होता येत नाही. असो, हे प्रियशिष्या, राम या जीवन्मुक्तपदास कसा प्राप्त झाला ते तूं ऐक. म्हणजे तूही सर्व अनार्थातून सुटशील. उपनयनानतर क्षत्रियपुत्रास उचित असलेली विद्या शिकण्याकरितां तो महात्मा गुरुगृही जाऊन राहिला. योग्य समयी विद्या समाप्त करून तो दाशरथि गुरूच्या आज्ञेने स्वगृही परत आला व काही दिवस त्याने मोठ्या मौजेने घालविले. पढे राजा दशरथ आपल्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करीत असून प्रजाही मानुषी किवा दैवी आपत्तिरहित होऊन आनदाने राजावर पित्याप्रमाणे प्रेम करीत असता गुणी रामान्या मनात, तीर्थे व पवित्र आश्रम पहावे असे आले. तेव्हा तो विनयसपन्न कौसल्यापुत्र आपल्या पित्याजवळ गेला व त्याचे पवित्र चरण धरून ह्मणाला " बाबा, पवित्र तीर्थे, आश्रम, वनें, देवस्थाने इत्यादि पहावी, असे माझ्या मनात आहे. आपण प्राणिमात्राची इच्छा पूर्ण करीत असता, तेव्हा मज दीनाचाही मनोभग करणार नाही. असे समजून मी ही प्रार्थना केली आहे. रामचद्राने अशा प्रकारे पूर्वी कधीही काही मागितलेले नाही, हे जाणून वसिष्ठाच्या समतीने राजाने सुमुहूर्तावर लक्ष्मणादि तिन्ही भ्रात्यासह रामास तीर्थयात्रेस पाठविले. प्रस्थानसमयी ब्राह्मणाकडून स्वत्ययन करविले, वसिष्टानी त्याच्या बरोबर चागले चागले ब्राह्मण दिले, मत्र्यानी यात्रेची धन-वाहनादि सर्व सामग्री रखाना केली व आपल्या मातास वदन करून ते गुरु, शुक्र, बुध व मगळ या ग्रहांप्रमाणे दिसणारे चारी भ्राते राजगृहातून मोठ्या थाटाने निघाले. राजपत्नीनी पुत्रास आलिगन व अनेक आशीर्वाद देऊन मोठ्या कष्टाने जाण्याची आज्ञा दिली, अयोध्या नगरीतील लोक रामास पोचवावयास निघाले, मगल वाद्याचा एकच गजर होऊन राहिला, आबालवृद्ध स्त्री- पुरुष त्या राजपुत्रांस आनदित चित्ताने व विकसित नेत्रांनी पाहूं लागले, नगरातील कन्या त्यांच्यावर लाह्या व पुष्पं फेकू लागल्या व अशा उत्सा-