या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सग २०. १८७ असो, जीवास मरणरूपी मूर्छा आली असता एका निमिषात त्रिभु- वनात्मक दृश्याची शोभा भासते. त्याच्या वर सागितलेल्या अत्य वासने- प्रमाणे देश, काल, आरभ, क्रम, उत्पत्ति, माता, पिता, वय, वित्त, ज्ञान, स्थान, बधु, इत्यादिकाची त्यास प्राप्ति झाली आहे, असे भासते. वस्तुतः तो चैतन्यरूपी व त्यामुळेच अज असतानाही " मी उत्पन्न झालो" असे समजतो. मरणानंतर योग्य समयी तो आपल्या मातेच्या उदरात शरीर धारण करण्याकरिता जातो. तेथे तो आपल्या मातेच्या हस्तपादादि अवयवा- प्रमाणेच तिच्या शरीराचा एक भाग होऊन रहातो. त्यावेळी ती तरुण असते. तिच्या शरीरातील रक्ताच्या योगाने तिचे इतर अवयव जसे पुष्ट व बळकट होत असतात तसाच हाही उत्तरोत्तर पुष्ट व बळकट होतो. त्यामुळे वस्तुतः विचार करिता मरणानतर मातेच्या शरीराशी तादात्म्य पावणारा हा, प्रथम तरुणच होतो, असे वाटते पुढे फुलामाग्रन फळ या न्यायाने त्यास मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर बाल्य. तारुण्य इत्यादि अवस्था क्रमाने प्राप्त होतात. ही माझी माता, हा पिता, हा मी इत्यादि त्यास स्मरण होते. त्याचे आयुष्य हा हा ह्मणता जाऊ लागते. त्याचे सर्व आयुष्य झणजे या अनादि कालाचा अगदीच स्वल्प भाग आहे, पण त्या तेवढ्याशा भागातही हा आपल्या अनेक वर्षांची कल्पना करितो. भ्रमामुळे असे होणे साहजिक आहे. तुझी मनुष्ये स्वप्नावस्थेतील थोड्याशा कालात अनेक वर्षाचा अनुभव घेत नाही का ' आनदाचा काल लवकर जातो; पण चितेचा व दुःखाचा काल लवकर जात नाही. जन्म हे दुःखाचे घर आहे. (पुष्कळ अज्ञास ते सुखाचे आगर आहे, असे वाटते हे खरे, पण शेवटी त्यानाही ते दु खरूप वाटल्यावाचून रहाणार नाही.) त्यामुळे प्राण्यास अनेक वर्षाचा भ्रम होतो. प्रिय स्त्री दूर गेली की, विषयी जनास एक दिवस वर्षाप्रमाणे वाटतो व ती जवळ असली की तिच्याशी गोड गोड गोष्ठी बोलताना रात्री व दिवस क्षणाप्रमाणे निघून जातात. साराश, या मायिक जगातील सर्व व्यवहार स्वप्नातील व्यवहाराप्रमाणे भआहे. त्यात भोग घेतल्यावाचूनच आमक्याचा मी भोग घेतला, असे वाटते ? व ज्याचा तो खरोखर भोग घेत असतो त्या आत्म्याचे त्याला भानही नसते. वस्तुत शून्य स्थान त्यास लोकानी भरलेले आहे, असे वाटते, सकटप्रसंगीही त्यास उत्सवाचा भ्रम होतो व हानीलाही तो