या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ बृहद्योगवासिष्ठसार. लाभ समजतो. मियामध्ये जसे तिखटपण असते किवा न खोदलेली चित्रे स्तभामध्ये असतात त्याप्रमाणे ज्या परमात्म्यामध्ये हे दृश्य जग अनन्य असते त्या परमेश्वरास सत्य वध व सत्य मोक्ष का व कसा असणार ? २०. सर्ग २१ -विचार करून पाहिले असता हे स्थूल सूक्ष्मरूप आहे, सूक्ष्म अविद्या- रूप आहे व अविद्या चिन्मात्र आहे, असा अनुभव येतो, अभे या सर्गात सागितले आहे श्रीदेवी--लीले, मिटलेले डोळे उघडले असता ज्याप्रमाणे अनेक रूपवान् पदार्थ प्रत्यक्ष दिसतात त्याप्रमाणे जीवास मरणरूपी मोहानतर दिशा, काल, आकाश, स्वर्गादि धर्ममय स्थाने, गहादि कर्ममय स्थाने, पृथ्वी, जल इत्यादि कल्पातापर्यत रहाणारी स्थाने इत्यादिकाचे भान होते. स्वप्नात जसे आपले मरण अनुभवास यावे त्याप्रमाणे पूर्वी कधी न पाहिलेलेही हे दृश्य माझे आहे, मी यास केलें आहे, असे स्मरण त्यास तात्काल होते. पण ही मायाकाशातील भ्राति आहे. यातील उद्भव, स्थिति, क्षय, नाश इत्यादि सर्व विकार वासनामय आहेत. सृष्टीतील ही सर्व विचित्रता जरी दुर्निरूपणीय आहे, ह्मणजे तिचे जरी वरोबर निरूपण करिता येत नाही तरी ती ( सृष्टि ) चित्तमय आहे, काल्पनिक आहे, असा निर्णय करिता येतो. चित्त ह्मणजे अनेक वासनाचा पुजका, हे तुला ठाऊक असलच. यास्तव शुद्ध मनाने चागला विचार करून चित्ताचे चित्तत्व नाहीसे केले पाहिजे. वासनांचा क्षय करणे व चित्तत्वाचा नाश करणे यात अर्थतः काही भेद नाही. यास्तव वासनाक्षय अथवा चित्तनाश झाला असता जगाचे अत्यंत विस्मरण होते व ते विस्मरण ह्मणजेच मोक्ष होय. जगाचे विस्मरण झाल्यावर हे अमुक मला प्रिय आहे व हे अप्रिय आहे, असे वाटत नाही. कारण त्या विस्मरणानतर रहाणारे चैतन्य भोक्ता व भोग्य यावाचून स्वाभाविक स्वरूपाने स्थित असते. अहता व जग याच्या स्थितीचे कारण आत्म्याचे अज्ञान आहे. त्यालाच अविद्या असेही ह्मणतात. तिचा बाध झाला असता स्वाभाविक मुक्तावस्था आपोआप व्यक्त होते. दोरीच्या ठायीं सर्पाचा भ्रम झाला असता दोरीचे ज्ञान हेच त्याच्या