या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० बृहद्योगवासिष्ठसार. ध्यानात धर पण या सर्गाच्या स्मरणास सस्काराचीही अगदी आवश्यकता आहे, असे जरी तू समजत असलीस तरी काही बिघडले नाही. कारण पितामह सर्वज्ञ असल्यामुळे त्याला पुढच्या सर्गाचाही अनुभव येणे शक्य आहे. यास्तव त्याचे संस्कार या सर्गाचे कारण आहे, असे तू समज. पण त्याच्या देहादिकाच्या उत्पत्तीस मात्र त्याचे सस्कार कारण नाहीत. कारण तो पूर्वी हिरण्यगर्भ नव्हता. त्यामुळे त्यास त्याचा अनुभवद्वारा सस्कार होणेही अयोग्य आहे, (असे मी पूर्वी सागितले आहे ). असो; लीले, वस्तुत असल्या शकेत व समाधानातही फारसे तात्पर्य नाही. कारण सर्वसाक्षि चैतन्यास सर्व सर्गाचा अनुभव सदा आहेच. कारण तें स्वय अनुभवरूप आहे. तुम्ही या विशेष सर्गाचा जरी पूर्वी अनभव घेतलेला नसला तरी सामान्यतः सगोचा अनभव कसा घ्यावा हे तुह्मास अपरिचित नाही. तर तुह्मा सर्वास पूर्वी अनेकदा अनभव घेऊन, त्याची मवयच लागून गेली आहे. यास्तव तुम्ही ज्या ज्या शरीरात जाल तेथे तथे “ हा मी व हे माझें" हे तुह्मास कोणी न शिकविताच समजेल. अस्तु. ___ एव च पूर्व-अनुभवान्या द्वारा उत्पन्न होणाऱ्या संस्कारामुळे होणाऱ्या स्मतीचे व अनादि अविद्यारूप वासनाजन्य स्मृतीचे कारण शबल ब्रह्म आहे. सर्व कार्य-कारणभाव त्या चिदाकाशात एकवटला आहे. अवि- वेकरूप अविद्येमुळे हा कार्य-कारणभाव विकल्प उद्भवतो पण विवेक केला असता त्याचा बाध होतो विकल्पाचा बाध झाला की, कारण व कार्य हा भेद उरत नाही. तर एक, सर्व विकल्पशून्य व शुद्ध अधिष्ठान रहाते. आता हेच युक्तिसिद्ध तत्त्व अनुभवारूढ कसे होईल ते सागते. चैत- न्याच्या आभासा(प्रतिबिंवा )ने युक्त असलेल्या समष्टीच्या व व्यष्टीच्या अतः- करणास स्मरण किवा वेदना ह्मणतात. ते शबल ईश्वराचे कार्य आहे. ( मायायुक्त ब्रह्मास शवल ईश्वर हाणतात ) व्यवहाराकरिता ईश्वराच्या उपाधीस माया व जीवाच्या उपाधीस अत करण ह्मणतात. या उपाधींच्या भेदामुळे अधिष्ठानभूत सन्मात्र चैतन्यामध्येही भेदाची कल्पना होते. त्यामुळे कार्याचे अस्तित्व कारणान्या अस्तित्वावर अवलंबून असते, असा भ्रम होतो व पूर्वी असलेले कारण आणे मागून असलेले कार्य, असा सामान्य जनाचा निश्चय होतो. पण तो बरोबर नाही. कारण माया