या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६ बृहद्योगवासिष्ठसार. ( अबाधित ) वस्तूस पहातो. पण तूं त्यास पहात नाहीस. कारण तुझा बोध चागला रूढ झालेला नाही. लीला-पण अदृश्य चित् दृश्यसत्त्वरूपतेस कशी प्राप्त झाली ? श्रीदेवी-लिंगात्म्याच्या सर्गामध्ये त्यास विषय करणाऱ्या चैतन्याचा चित्त्व हा धर्म उद्भवतो व पचीकरणकल्पनेने जेव्हा स्थूलरूपी कल्पना होते तेव्हापासून त्यात अनुगत असलेले सत्त्व दृश्याप्रमाणे होऊन आपणच आपल्यास भ्रातीने पहाते. लीला-पण एक, अत्यत शात व सर्व विभागशून्य असे पर तत्त्व अस- ताना त्यात कल्पनेस अवकाशच कसा मिळाला ? कारण पूर्वी जे दूध असते तेंच पुढे दहीं होते व ते एकदा दही झालं की मग दुधाचे अस्तित्व नसते. पण ब्रह्म एक व सत्य झणजे कालत्रयसबधशून्य आहे. तेव्हा त्याचे ठायी प्रथम विकार कसा होणार । श्रीदेवी-ब्रह्माच्या ठिकाणी होणारा हा विकार जर सत्य असता तर तू ह्मणतेस तसा दोप आला असता. पण सोन्याचे ठायी जसे कडे, जलामध्ये जसे तरग, स्वप्न, मनोराज्य इत्यादिकातील विषयाचे ठायी जसे सत्यत्व तसें ब्रह्माचे ठायी हे प्रपचत्व मिथ्या आहे. जलादिकाचा अनुभव आला असता तरगादि विकार जसे लुप्त होतात त्याप्रमाणे ब्रह्मानुभव आला असता प्रपचाचा लय होतो. आकाशात धूळ जशी नसते तसा ब्रह्माचे ठायीं एकही विषय नाही. जे काही भासत आहे ते सर्व ब्रह्म आहे. लीला-देवि, इतके दिवस आझाला या भ्रमात कोणी पाडिले होते ? श्रीदवी-अग खुळे, अविचाराने तुला या भ्रमात पाडिले आहे व त्यामुळेच तू फार दिवसापासून अनर्थात पडून व्याकुळ झाली आहेस. हा अविचार स्वाभाविक आहे. ह्मणजे तो कोणाच्या उपदेशावाचून आपोआप प्राण्याचे ठायी प्रवृत्त होत असतो. पण विचाराच्या योगाने तो नाहीसा होतो. विचाराने जिला बाधित करून सोडिले आहे अशी अविचाररूपी अविद्या ब्रह्मसत्ताच बनते. त्यानतर अविचार रहात नाही; अविद्येचे नाव ऐकू येत नाहीं; बधन व मोक्ष याची वार्ता उरत नाहीं आणि सर्व जग शुद्ध व आनंदस्वरूप बोधमय होऊन जाते. इतके दिवस