या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पविकरणं-सर्ग २९. आवडत असे. देव, ब्राह्मण च संत याची मी सदा अनन्य मनानें भक्ति करीत असे. घृत व गोरस अंध्या योगाने माझे अग पाढरे होत असे. (झणजे आमच्या घरी ती दोन्ही विपुल असून मी ती सर्वांस वांटीत असें, ) उपकरणी व यशाची पात्रे मी आपल्या हातानी घाशीत असें. कचिच्या बागड्या पुष्कळ घातल्यास काम करितांना त्या वारवार वाढवतात, असे पाहून मी एकच बांगडी घालीत असे; पण तिलाही पाने वाढतांना अन्नाची पुटें बसत असत. जावई, कन्या, पतीचे व आपले भ्राते, पिता, माता इत्यादिकाची सेवा करण्यातच मी निमग्न असे. मरेपर्यंत अहोरात्र पुत्र, स्नुषा, सेवक इत्यादिकांस 'आटपा, आटपा; उशीर झाला; स्नानाला किती वेळ लाक्लिास, पाण्याची एक घागर आणायला गेलीस ती किती वेळाने परत आलीस १ अरे बाबा, इतक्या उशीराने का आलास ? ' इत्यादि मणण्यांत माशा काल जात असे. मा कोण व हा ससार ह्मणजे काय ? याची वार्ता स्वप्नातही माझ्या कानी पडली नाही. कारण मी एका कर्मठ श्रोत्रियाची पत्नी होते व तत्त्वज्ञानाच्या अभावी तोही मजप्रमाणेच गृहकमोत व विधि-निषधात आसक्त होता. एक निष्ठेने समिधा, दूर्वा, पलाशादिकाची पाने, दर्भ, गायीच्या शेणाच्या शेणी (गोवऱ्या) इत्यादिकांस आणणे, त्याचा सचय करून ठेवणे इत्यादि कामापुढे त्यासही इतर विचार करण्यास फारसा अवकाश मिळत नसे. डोक्याला धाबळी बाधून, मस्तकाला व अगाला भस्म फासून तो अर्थ- रहित वेदाक्षरे ह्मणत व आपणास जेवढे अवगत आहे तेवढे दुसऱ्यास शिकवित त्याचे आयुष्य जात असे. प्रात.कालचा होमादि विधि आटोप- ल्यावर शिष्याना वेदाक्षराचा पाठ सांगताना उन्हात बसून गायींच्या वास- राच्या कानातील गोचिड्या काढून टाकण्याचा त्याचा परिपाठ असे. माझ्या पायास थारा ह्मणून कसा तो मुळीच नसे. मी आपल्या परसांत भाजी पेरिली होती. ती सुकून जात आहे, असे मला किंवा माझ्या त्या पतीला दिसले की, आमी पाणीघालणाऱ्या नोकराना हाका मार-मारून व रागें भरून लवकर पाणी घेऊन या, झणून ओरडून सागत असो. आमच्या आगरातून पाण्याचे पाट वहात असत. त्याच्या कडेला कोवळे व हिरवें चार गवत उगलेले असे. तेथे लहान लहान गायींच्या वासरांना नेऊर मी स्वतः चरवीत असे. घरांत व दारात केर पडलेला दिसला की, लाग-