या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३४ बृहद्योगवासिष्ठसार. माहे, असा त्या दोघींचा निश्चय असल्यामुळे व अतर्धानादिकात फार कुशल असल्यामुळे त्याही नि शंकपणे अंतरिक्षात शिरल्या. तेथे मेघमड- लानी जसें आकाशास आन्छादित करून सोडावे त्याप्रमाणे नभश्चराच्या गणानी ते व्याप्त होते. सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, शूरांचे ग्रहण करण्याकरिता आलेल्या अप्सरा, रक्तमासादिकाच्या लोभाने जमलेली व आनदाने नाचरणारी भूते, राक्षस, पिशाचे, पुष्पाचा वर्षाव करण्याकरितां हातातून पुष्कळ पुष्पे घेऊन आलेल्या विद्याधराच्या स्त्रिया, इत्यादिकाची तथे एकच गर्दी झाली होती. योध्याच्या शस्त्रास्त्रापासून आपणास त्रास होऊ नये ह्मणून वेतालादिकानी पर्वताच्या शिखराचा आश्रय केला होता. खाली सग्राम करीत असलेल्या लोकाची शस्त्रास्त्रे येथपर्यत येण्याचा सभव आहे, असे पाहून अतरिक्षात अगदी पुढे गेलेले नभश्नर मागे पळत होते. अभिमानाने भरलेल्या लोकाच्या आरोळ्यानी ते ( अतरिक्ष ) भरून गेले होते. त्यातील प्राणी पुढे होणाऱ्या या भयकर समामाविषयी नाना प्रकारच्या वार्ता आपसात बोलत होते त्यातील, सहज हास्य व विलास याविषयी उत्कठित झालेल्या सुदर स्त्रियानी आपल्या हातात चामरे धारण केली होती. अतिशय वर्माचरणामुळे दुस- यस न दिसणारे व योगसामर्थ्यामुळे श्रेष्ट झालेले मुनि त्या अतरिक्षात उभे राहन जगाच्या स्वास्थ्याकरिता देवताचा स्तव करीत होते. गर्वादि लोकपाल आपल्या अप्सरा-प्रभृति स्त्रियानी आपली उपेक्षा करून खालून नवीन येणाऱ्या वीराशी सबध करू नये ह्मणून त्याची त्या कालास अनु- रूप अशी स्तुति करीत होते. स्वर्गास योग्य असलेल्या शूरास आणण्या- करिता इद्राचे भट तेथें व्यग्र होते. त्या अतरिक्षात शूराचा सन्मान कर- ण्याकरिता लोकपालाचे ऐरावतादि हत्ती अलकृत करून उभे केले होते. येणाऱ्या शूराचा सन्मान करण्याकरिता तेथील गधर्व व चारण अगदी सज होऊन राहिले होते. शूरास वरण्याविषयी उत्कठित झालेल्या अनेक देवास्त्रिया सैन्यातील शूराकडे वक्र दृष्टीने पहात होत्या. लंपट झालेल्या स्त्रिया वीराच्या भुजदडास घट्ट धरून ठेवित होत्या. तेथील शूराच्या यशाने दिवाकर( सूर्य )ही चद्रतुल्य शीतल झाला होता. (लणजे त्याच्या यशापुढे सूर्याचें तेजही मंद झाले.)