या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ३४. २४१ कबधे रणवाद्याच्या तालावर मोठ्या उल्हासाने व वेगाने नाचत आहेत व त्याच्या नुकत्याच तुटलेल्या मानेच्या छिद्रावर ककादि पक्षी आसक्त होऊन रक्तमासाचा यथेच्छ उपभोग घेत आहेत. देवाच्या समूहामध्ये गोष्ठी चालल्या असून त्यात कोणते धीर पुरुप केव्हा, कोणत्याप्रकारे, व कोणत्या निमित्ताने लोकातरास प्राप्त होतात याविषयी परस्पर चर्चा चालली आहे. अरे, हा योद्धा तर कोणी भयकरच आहे. कारण समुद्राकडे अनेक लहान- मोठया जलजतूनी भरलेल्या नद्या कितीही जरी आल्या तरी तो जसा यान आपल्या उदरात साठवितो त्याप्रमाणे याच्यावर कितीही लोकाचे ममूह चालून आले तरी तो त्यातील एकालाही जीवत ठेवीत नाही. हत्तीच्या गडस्थळावर बाणाचा वर्षाव एकसारखा होत आहे व त्यामुळे मेघदृष्टि होत असलेल्या मोठ्या पर्वत-शिखराप्रमाणे ते शोभत आहत. एके ठिकाणी दोघे वीर लढत होते. त्यातील एकाने मोठ्या शार्याने दमयान्य मानेवर भाला फेकला. तेव्हा आता आपण वाचत नाही, असे समजून तो दुसरा मेलोरे मेलो" असे ओरडून ह्मणणार होता, पण इतक्यात मानच तुटल्यामुळे त्याचे ते शब्द बाहेर उमटले नाहीत. चापि तो रणागणी शत्रूच्या सन्मुख लढता लढता मेल्यामुळे स्वर्ग- लोकी जाऊ लागला. त्याबरोबर " वाचलोरे वाचलो" असा ध्वनि याच्या तोडातून निघाला आणि तो खालच्या व वर विमानात असलेल्या लोकास पक्ष्याच्या ओरडण्याप्रमाणे ऐकू आला सैन्यातील कोणी एक अधि- कारी आपल्या हाताखालच्या असख्य शूरास ह्मणतो-अरे ही शत्रूची सना आपल्यावर यत्राच्या योगानें पापाणाचा वर्षाव करीत आहे. यास्तव तिला अनुइटखलासमूहाने वेष्टित करून सोडा. कोणी देव ह्मणतो-अरे ही अप्सरा पूर्वी याची भार्या होती. पण तो वृद्ध झाल्यामुळे त्यास सोडून ( म. मरून ) अप्सरा होऊन राहिली व आतां तो रणागणात रून तरुण देव झाला आहे, असे जाणून पुनः त्याची प्रिया बनली, गल्याच्या चकचकीत पात्याची किरणे अंतरिक्षात पडत होती. त्याच्याकडे इन रगात देहत्याग करणारास स्वर्गलोकीं येण्याकरिता हा जिनाच ला आहे की काय, असा भास होतो. एक भितरा ह्मणतो-अरे, अरे, । शत्रच्या लोकानी आमच्या वीराचा एकसारखा सहार चालविला हि. काय करावें ! मला तर हा प्रलय-कालच आला आहे, असे