या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ३५-४०. २४३ त्यात अडकून राहिलेले चकचकीत बाण ह्याच शफरी (क्षुद्र मासे ) होन्या. घोड्यावर बसलेले स्वार, घोड्याच्या उडत चालण्यामुळे, त्यातील कलोल आहेत, असे भासत होते. नानाप्रकारची आयुधे याच त्यास येऊन मिळणाऱ्या नद्या असून त्याच्या समागमामुळे भ्रमण करणारे सैन्य हेच त्यातील मोठमोठे आवर्त ( भोवरे ) होते. मत्त गजाचा समूह हेच त्यातील समूल चचल झालेले मदारादि पर्वत होत. शेकडो गरगर फिरणारी चक्रे हेच क्षुद्र आवर्तभ्रम असून त्यात भ्रमण करणारी मस्तके हेच तृण आहे वर उडालेली धूळ हेच त्यात पाणी पिणारे मेघ असून खड्गाची प्रभा हेच मेव जल होय. मकर-व्यूह हेच त्यातील मकर, वीराचा ध्वनि हाच वर ध्वनि, वीराच्या शरीरातून पार निघून जाणारे बाण हीच त्यातील क- लवे आणि शस्त्रे ह्याच त्यातील मोठ्या लाटा असून त्याच्या योगाने तुटणाऱ्या पताका ह्याच लहान लाटा व सैन्याचे, कोवाने होणारे सचार हेच त्यातील तिमिगल नावाचे महामत्स्य होत. पोलादाची कवचे अगात घालून इतस्तत फिरणारे सैन्य हेच त्यातील जल, बाण हेच न्यातील तुषार, व इतर सर्व ध्वनीस तुच्छ करून सोडणारा सैन्याचा सिंहनाद हाच त्यातील मोठा ध्वनि होय ज्यान्या मस्तकाचे तुकडे उडून गेले आहेत अशी कबधे हीच त्यातील लाटाबरोबर वहात जाणारी काष्ठे होती. वहाणारे रक्ताचे पूर ह्याच त्यास येऊन मिळणाऱ्या महानद्या असून रय हेच त्याच्या काठचे नानाप्रकारचे वृक्ष होत. साराश येणेप्रमाणे तो रणप्रदेश सागराप्रमाणे दिस्त होता अथवा तो गधर्वनगराप्रमाणे ( आकाशात दिसणाऱ्या खोट्या नगराकाराप्रमाणे) मनुष्यास अतिशय आश्चर्यकारक वाटत होता ( आता त्याचे कल्पात- रूपाने वर्णन करितात. ) अथवा तो कल्पातच होता कारण तेथील प्रदेश प्रलयकालच्या भूकपामुळे हालणाऱ्या पर्वताप्रमाणे चचल दिसत असे. मासाच्या व रक्ताच्या आशेने वेगाने उडणार असरन्य पक्षी ह्याच त्यातील भयकर लाटा होत्या शस्त्राच्या प्रवर प्रहारामुळे छिन्न भिन्न होऊन पडणारे अनेक गज हेच प्रलयसमयी उलथून पडणारे पर्वताचे कडे होत. भ्यालेल्या लोकाचा आक्रोश हाच प्रलयकालचा पशूचा घुरघुर ध्वनि, बाणपक्ति हाच टोळाची राग, काळे गज हेच मेघः रक्ताचे पाट ह्याच नद्या; तुटून पडलेल्या हातापायावरील रेखाचिते हीच