या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सगे ३५-४०. २४२ कला सर्व त्रिभुवनास दाखविली. इतक्यात ईश्वरी नियमाप्रमाणे श्रीसूर्य- नारायण त्या रणभूमीप्रमाणे व योध्याच्या शरीराप्रमाणे लाल भडक झाला व मरणोन्मुखाच्या चेतनाशक्तीप्रमाणे अस्त पावला. त्यामुळे वीररसाने ज्याचे शरीर भरून गेले होते अशा कित्येक क्षत्रियास आपला मोठा घात झाला, असे वाटले. गृध्रादि मासभक्षक दिवाचगस आपल्या यथेच्छ आहारसुखात ही मोठीच अडचण आली, असे भासले रामा, आहाराकरिता ते पक्षीही त्या रणागणात वीराचे अनुकरण करीत होते. तेही एकमेकागी लढून दुर्बळाच्या तोडातील मामाचा तुकडा ओदन ऊन, आपला जठराग्नि अथवा राक्षसी तृष्णारूपी अग्नि शात करीत होते मनुष्येही जर एक- मेकाची शरीरे कृत्रिम शस्त्रास्त्रानी फाडीन आहेत तर आह्मा तिर्यक- प्राण्याना ईश्वरदत्तनखादि-आयुधानी आपल्यापेक्षा दर्बल असलेल्या प्राण्या- वर यथेच्छ प्रहार करण्यास कोणता प्रत्यवाय आहे ? अमेच जणु काय मनात आणून कावळे, गिधाडे, घारी, कोल्हे, भालू, तरसे इत्यादिकानी न्याच रणभूमीस धारातीर्थ बनविले होते पण वर मटल्याप्रमाणे भगवान् जगचक्षु अस्त पावल्यामुळे त्याचा हिरमोड झाला आता रात्रभर आपणास जापल्या घरट्यात किवा झाडाच्या खाद्या, मदिराचे उच्च भाग इत्यादिकावर बसून एकाद्या विरक्त तपस्व्याप्रमाणे अथवा एकाद्या दाभिकाप्रमाणे सूर्योदय केव्हा होतो ह्मणून ध्यान करावे लागणार व आशेने चित्त विक्षिप्त झाल्यामुळे निद्रासुखाचाही लाभ न मिळता ही रात्र काळरात्रीसारखी दीर्घ भासणार, असे मनात आल्यामुळे जणु काय ते पक्षीही भूमीवरील योद्धयाप्रमाणेच चिताग्रस्त झाले असावेत, असे विमाना- तून पहाणाऱ्या विद्याधरादिकास वाटले. पण काल प्राण्याच्या सुखदुःखा- कडे थोडेच लक्ष्य देतो आहे. त्याने पश्चिमेकडील आकाशास लाल करून सोडले. तेव्हा त्या आरक्त व अनेक भ्रामक आकाराने युक्त अशा आका- शाकडे पाहाणारास त्यात खालच्या रणागणाचे प्रतिबिंबच पडले आहे, असा भास होई अस्थिर कालाने त्या रक्ततेलाही फार वेळ राहू दिले नाही. तेव्हा मात्र भूस्थ योदयाची व अतरिक्षात उडणाऱ्या पूर्वोक्त पक्ष्याची निराशा झाली. वीरानी आपला युद्धोद्योग परस्पराच्या समतीने सोडिला. सैन्य शिबीराकडे जाऊ लागले व पक्ष्यानी आपापल्या वसती. स्थानाचा मार्ग धरिला. जगास भ्रम ह्मणणाऱ्या वेदात्यावर जणु काय