या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ४१. २५७ घेतलास ? हा प्रश्न ऐकून तो मत्री ह्मणतो-देवि, तुमच्याच कृपाकटाक्षाने तुह्मापुढेही बोलण्यास समर्थ होऊन मी या माझ्या स्वामीचा वृत्तात सागतो. इक्ष्वाकुवशात कुदरथ नावाचा एक महाबलाढ्य राजा होऊन गेला. त्यास भद्ररथ ह्मणून पुत्र होता. त्यास विश्वरथ झाला. त्याच्यापासून बहद्रथ, बृहद्रथापासून सिधुरथ, सिधुरथापासून शैलरथ, शलरयाचा कामरथ, कामरथाचा विष्णुरय, व विष्णुरथाचा पुत्र नभारथ झाला. त्या महात्म्या नभोरथाच्या उदरी आमा सर्व प्रजाजनाच्या मोठ्या भाग्याने हा आमचा विदूरथ नामक स्वामी जन्मला. याच्या मातेचे सुमित्रा असे नाव आहे. या आमच्या राजाचा पिता फार विरक्त होता. त्यामुळे, हा पुत्र दहा वर्षाचा होताच, राज्य त्याच्या स्वाधीन करून स्वतः वनात जाऊन राहिला तेवढ्या अल्पवयापासून हा आमचा देव आमचे रक्षण करीत आहे. दीर्घकाल कष्टकर तपश्चर्या करूनही ज्याचे दर्शन होणे अशक्य अशा तुह्मी दोघी दिव्य देवी आमच्या आज दृष्टी पडला; यावरून आमचे अनेक जन्मीचे सुकृतच आज फळास आले, 'असें आमी समजतो आपल्या या अनुग्रहामुळे आह्मी सर्व व विशेषतः हा आमचा राजा आज कृतकृत्य झाला आहे. याच्या जन्माचे आज साफत्य झाले -असे बोलून तो मत्री स्तब्ध बसला असता आपल्या समोर पद्मासन घालून विनयाने हात जोडून बसलेल्या राजाच्या मस्त- कावर हात ठेवून ती देवी ह्मणाली, "राजा, विवेकाच्या योगाने तुला पूर्वज- न्माचे स्मरण होऊ दे " त्याबरोबर राजाच्या हृदयातील जीवास आच्छादित करणारे तम क्षीण झाले व सूर्योदय होताच भूमडल जसे प्रकाशयुक्त होतें त्याप्रमाणे त्याचे अतःकरण प्रकाशयुक्त व निमल झाले. त्यास सर्व पूर्व वृत्तात आठवला. देह व साम्राज्य याच्यावरील अभिनिवेश नाहीस झाला. त्याने लीलेस ओळखिलें. फार काय पण त्या देवीच्या अनुग्रह . मुळे अनुभव न घेतलेल्या गोष्टींचेही प्रत्यक्ष स्फुरण त्याच्या चित्तात झा त्यामुळे विस्मित झालेला तो आपल्या मनात ह्मणाला. "हर हर, या संसारात कशी माया पसरली आहे, पहा. मला आज या देवीच्या प्रसा- दाने हे सर्व गौडबगाल समजलें." इतके मनात आणून तो त्या देवीस उघड ह्मणला-हा काय चमाकार आहे ? मी पम या नावाचे शरीर सोडले त्यास अजून एक दिवसही झाला नाही; पण येथे जन्म घेऊन