या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ४३. २६५ आहे. मी जी आता प्रार्थना करीत आहे, त्याचे उत्तर दे. भक्ताची अवहेलना करणे महात्म्यास शोभत नाही. मी जेथे जाईन तेथे हा माझा मत्री व ही अविवाहित कुमारी येईल, एवढी मजवर कृपा कर. राघवा, ही त्याची प्रार्थना एकून घेऊन देवी ह्मणाली-"राजा, तू आपल्या इच्छेप्रमाणे पूर्व जन्मीच्या राज्यात ये व तेथे लीलेच्या भक्तीप्रमाणे व भाग्याप्रमाणे विलास कर. आमी आमच्या भक्ताचें मन कधीही दुखवीत नाही." ४२. सर्ग ४३-या सगात अभीष्ट वरदान, नगरदाह व त्यात जळणाऱ्या नगरवासि- ___ याच्या चेष्टा य.चे वर्णन केले आहे श्रीसरस्वती-राजा, या रणागणात तू आज मरण पावशील व तुला पुनरपि प्राकन राज्य प्राप्त होईल पुष्पाच्या राशीत ठेवलेल्या पद्माच्या शवात त पुन प्रवेश करशील व मत्री आणि कुमारी तुजबरो- वर येतील. आही दोघीजणी पुढे जातो. तूही मरून आतिवाहिक देहाने मत्री व कुमारी यासह तेथे ये. अश्व, गज, खर, उष्ट्र इत्यादिकाची गति निराळी असते व सूक्ष्म देहाची गति निराळी आहे. ( ह्मणजे अश्वाटिकाच्या गतीस विस्तृत मार्गादिकाची अपेक्षा जशी असते तशी या अतिवाहिक गतीस नसते. कारण, मनोरथाप्रमाणे, याचा सचार मडपाच्या आतील अति सकुचित आकाशातही फार दूरवर होऊ शकतो.) श्रीवसिष्ठ- राघवा, त्याचे इतके जो भाषण होत आहे, तों राजगृहावरील उंच प्रदेशी चढून चोहोकडे टेहळणी करणारा रा- जाचा सेवक मोठ्या गडबर्डीने येऊन राजास ह्मणाला, " राजाधि- राज, शत्रूची सागरासारखी फार मोठी सेना आपल्या या नग- रावर अनेक शस्त्रास्त्राचा एकसारखा भडिमार करीत अगदी ज- वळ येऊन पोचली आहे. त्यातील काही दुष्ट सैनिकानी तर तटावर चढून या नगराच्या एका भागास आग लाविली आहे. त्यामुळे आकाशात धुराचे लोट चाललेले स्पष्ट दिसत असून चटचट शब्द यथेही महज ऐकू येत आहे. जळलेली गहे भराभर भूमीवर कोसळून पडत आहेत." रघुवीरा, तो इतके सागत आहे तो नगरात मोठा कोलाहल झाला. लोकाचा आक्रोश, वीराचा सिहनाद, धनुष्याचा टणत्कार, मत्त गजाचे बृहित