या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ४४. २६९ त्याप्रमाण दुरून एकाएकी नगरावर येऊन कोसळणाऱ्या या शत्रूच्या वीरानी नगरातील सर्वस्वाचा नाश केला राजगृहात शिरून, अनाथा- प्रमाणे आक्रोश करणाऱ्या आपल्या अतःपुरवगांस, केस व वस्त्रे धरून फराफर ओढून नेले. आमच्या या स्वामिणीची काही पूर्व-पण्याई होती ह्मणून तिने व आमी हे पाय पाहिले. आता या आपत्तीतून आमास सोडविण्यास आपणच समर्थ अहा. असो, इद्राशी भापण करणाऱ्या अप्सरेप्रमाणे तिचे हे मजुळ भापण ऐकून व त्या दोघी देवीकडे पाहून राजा ह्मणाला, “ जननी, मी आता युद्ध करण्याकरिता जातो. मला क्षमा करा. ही माझी पत्नी तुमची दासी आहे, असे समजा " इतकें बोलून, तो कोपाविष्ट झालेला राजा, नेत्र टाल करून सिहाप्रमाणे बाहेर पडला. नतर देवीबरोबर आलेली प्रबुद्ध लीला आरशातील प्रतिबिबा- प्रमाणे, अगदी आपल्या आकारासारखाच जिचा आकार व भाषणादि सर्व आहे अशा त्या राजाच्या पत्नीस पाहून देवीस ह्मणाली-जननि. हा काय चमत्कार आहे? जी मी तीच ही स्त्री कशी झाली? तरुणपणी मी जशी होते तशीच ही कशी झाली? मत्री, नगरवासी, योद्धे, सैन्यातील लोक, अश्वादि वाहने इत्यादि हे सर्व पूर्वीचेच आहेत. असे मला वाटते ते सर्व येथे व तेथेही कसे रहातात आरशात दिस- णारे प्रतिबिब व त्याच्या बाहेर असलेला पुरुप हे दोन्ही सचेतन कसे असतील! श्रीदेवी-(चिति-शक्ति अतर्व्य आहेत. त्यामुळे तुल्य कर्मामुळे उद्बावित झालेल्या त्याचा आविर्भावही केव्हा केव्हा तुल्यच होतो. अशा अभिप्रायाने दृष्टिसृष्टिवादाचा आश्रय करून देवि समाधान करिते.-) आत जशी ज्ञप्ति उत्पन्न होते तसाच तत्क्षणी प्राणी अनुभव घेतो. जसे मन, स्वप्नादिकामध्ये, जाग्रतीत अनुभव घेतलेल्या पदार्थाच्या आका- राचे होते त्याप्रमाणे चिति अध्यासाच्या योगाने विषयाकार बनते. सस्कारात्मक जगाचे स्वरूप जसे चित्तात व चितींत असते तसेंच ते, सस्कार जाग्रत् झाले असता, उदय पावतें. (भोक्त्याच्या अदृष्टाप्रमाणे उद्बद्ध झालेली मायायुक्त चितिशक्ति अघटित घटना करण्यास समर्थ आहे, असा याचा भावार्थ समजावा.) त्यामुळे अल्पदेश, अल्पकाळ. विपुलदेश, विपुलकाल इत्यादिकाचा विरोध रहात नाही. झणजे हा सर्व