या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरणं-सर्ग १२. जन्म घेण्याकरितांच मरतो. कारण मरणसमयीं त्याला जरी असंख्य असह्य यातना होत असल्या तरी केलेल्या पुण्यपापांचा अभिमान त्याच्याने सोडवत नाही. तर मी अमुक केलें, अमुक करविलें, अमुक करावयाचे आहे, यांतून उठल्यास ते करीन इत्यादि वासनामय अहंकार त्याच्या अंतःकरणांत कायम असतो व त्यामुळे त्याने त्या जीर्ण शरीरास जरी सोडिले तरी त्याला पुनरपि जन्म घ्यावा लागतो. मरणाप्रमाणे जन्मही असह्य दुःखदायी आहे. जन्म व मरण यांच्या मधली अवस्था (ह्मणजे जीवित काल) तरी सुखमय असेल व बऱ्याचशा सुखाकरितां थोडेसे दुःख सहन केले ह्मणून काय झाले ? अशी मनाची समजूत करून घ्यावी, तर त्या मध्य-अवस्थेत तरी सुख कोठे आहे ? शरीर असेपर्यंत एकना एक व्याधि त्याच्या मागे असतेच. आज काय मस्तकशूल उठला, उद्या ताप आला, परवा पडसे झाले, तेरवा दात दुखू लागला, दात बरा होतो आहे तो पोट बिघडले, औषधोपचारानी ते बरे होत आहे तों घरास आग लागली, नवीन घर बांधून ससार थाटावा तो गुराचा, रोग येऊन दहा पाच गुरांचा नाश झाला, बायको मेली, तरुण मुलाने स्वर्गी प्रयाण केलें, द्रव्य चोरीस गेले, राजाचा कोप काही आरोप आला, सारांश जिवत असे पर्यत ऐश्वर्याच्या जोरा गता येत नाही. कारण या सृष्टीतील सर्व भाव (पदार्थ ) त्यांची स्थिति स्थिर नाही. ते प्राण्यास नियमाने एक सुख दु.ख तर दुःखच देत नाहीत. तर जो पदार्थ या देत आहे तोच घटिकाभन्याने दुःख देतो. आज दुःख भोगावे लागते तोच आणखी चार दिवसानी। तस्मात् सर्व भाव आपत्तींत पाडणारे आहेत. जग। सख्य वस्तु आहेत त्याचा परस्पर सबध काही नसतो. पण मानसिक प्रकल्पाने त्यांतील कित्येकांस आपल्याशी संबद्ध क.. त्येक हे. आपले नव्हेत, असे मानतो. अर्थात् प्राण्याच्या भोर होणारे हे जग मनाच्या अधीन आहे. मन तर विवेक केला अस असल्यासारिखें भासते. पण या असत् ( अविद्यमान ) मनानेच आम मूढांस अति कष्टांत पाडले आहे. आझांस खरोखर कोणी विकलेलें नसतांना आह्मी विकल्याप्रमाणे परतत्र होऊन राहिलो आहों, व सर्व काही