या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ४४. २७१ लेले द्रव्य विशीर्ण होते (म. त्याचे अवयव निरनिराळे हो- ऊन क्षय पावतात ) व बाधप्रसगी अधिष्ठानभूत वस्तूचा सा- क्षात्कार ( अनुभव ) आला असता त्या अनुभवाच्या बलानेच आरोपित वस्तु क्षीण होते. पण याप्रमाणे नाश व बाध याची निमित्तें जरी भिन्न भिन्न असली तरी याच्या क्षयामध्ये मुळीच अंतर नसते. (पूर्वी अधिष्ठानाच्या दृष्टीने जाग्रत व स्वप्न यातील वस्तूस सत्यता कशी असते ते सागितले आणि आता येथवर त्याची असत्यता वर्णिली. त्यामुळे त्या दोन्ही अवस्थांची अनिर्वचनीयता समानच आहे, असें ह्मणण्यास काही अडचण नाही, असे आतां देवी सागते.) लीले, याप्रमाणे हे दृश्य सत् नाही व असत्ही नाही. तर तें केवल भ्रांतिमात्र आहे. तस्मात् महा कल्पात झाला असता, सृष्टिसमयीं व पुढे होणा-या अनेक युगामध्ये अशा या तीन कालातील कोणत्याही काली आपणास जे नाही ह्मणून वाटते ते खरोखर स्वरूपत. जरी नसले तरी त्याची कल्पना होण्यास अधिष्ठान असलेले जे ब्रह्म तें असतेच. ( त्याच्या स्वभावात व स्वरूपात कधीही अतर. पडत नाही.) यास्तव तेच जग होय. हे भासणारें अब्रह्मरूप (अनात्मरूप ) जग, खरे जग नव्हे. जल- तरंगन्यायाने ब्रह्मामध्ये या अनेक सृष्टि उत्पन्न होऊन लय पावतात. तेव्हां दग्धपटाप्रमाणे असलेल्या या भस्मरूप प्रपचामध्ये काय आस्था ठेवावयाची आहे ? ( आता विषयाचा जरी बाध होत असला तरी मिथ्या ज्ञानाचा बाध होत नसतो. तेव्हा त्याच्यामुळे द्वैताची सिद्धि होईल, असे कोणी झणेल ह्मणून देवी ह्मणते-) विषयरहित ज्ञान परस्पर भिन्न आहे किवा ते ब्रह्माहून भिन्न आहे, असे समजण्यास काहींच सबल कारण नसल्यामुळे कोणतेही ज्ञान ब्रह्ममात्रच आहे, असें ह्मणावे लागते. गाढ अधकारात बालकास जसें भूत दिसते त्याप्रमाणे आत्माज्ञानात अविवेक्यास जन्म- मरणादि मोह होतो. आत्म्याच्या अज्ञानास व्यामोह ह्मणतात. त्याच्या आवरण व विक्षेप अशा ज्या दोन शक्ति आहेत त्यास व्यामोहत्व ह्मणतात व ते व्यामोहत्वच जगद्रपाने पसरले आहे. ब्रह्मज्ञानाने सर्व दृश्याचा बाध होणे यास वैज्ञानिक प्रलय ह्मणतात. या महाप्रलयासह सर्व बाध्य आहे. यास्तव सर्वाचा बाध झाल्यावर जे अवशिष्ट रहाते ते ब्रह्म होय. तेच मर्व बाध्याचे अधिष्ठान आहे. त्याची सत्ता दृश्याचे सत्त, असत्व इत्यादि सर्व