या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ४८-५१. २७९ रणागणात स्थिर असलेल्या वीराप्रमाणे दिसत होते. असो; सूर्य जसजसा वर येऊ लागला तसतसा त्या दोन्ही सैन्यातील लोकांचा उत्साहही वाढू लागला. अंतरिक्षांत जसे चंद्र-सूर्य दिसतात त्याप्रमाणे त्या रणांगणात विदूरथ व सिंधु यांचे असख्य वीरांनी परिवेष्टित झालेले देदीप्यमान रथ दिसत होते. त्यांचे सारथी नानाप्रकारच्या चित्रविचित्र गतींनी अश्वास चालवून एकमेकास चकित करीत होते. अनेक शस्त्रास्त्राचा उपयोग करून प्रत्येकवीर व ते दोघे राजे आपला विजय व्हावा ह्मणून दीर्घ प्रयत्न करीत होते. शेवटी त्या दोन्ही राजाचे रथ एकमेकाजवळ आले. दोघानीही आपली तीक्ष्ण शस्त्रास्त्रे परस्पराच्या शरीरावर टाकली. एकमेकाचा प्राण घेण्याकरिता त्यातील प्रत्येकजण आपली शक्ति क्षीण करू लागला. बाण, खङ्ग शक्ति, शतघ्नी, मुद्गर, पाषाण, मुसल, तीक्ष्ण अग्राचे भाले व दुसरीही अनेक शस्त्रे याचा त्यांनी उपयोग केला व येणेप्रमाणे खवळलेल्या समुद्रा- प्रमाणे ते दोघेही मारीन किंवा मरेन या दृढ निश्चयाने समरदेवतेची आराधना करू लागले ४७. सर्ग ४०-५१ --या सर्गात त्या दोघा राजाचे घोर युद्ध, अनेक अस्त्राचा प्रयोग व प्रतीकार, शेवटी राजा विदूरथास आलेली भयकर मूर्छा, राजा रणभूमीत पडला, हे ऐकून नगरात झालेला कोलाहल, सिंधुराजाची राज्यप्राप्ति व त्याने भूमंडळी पुन स्थापिलेली स्वम्यता याचे वर्णन केले आहे. श्रीवसिष्ठ-दाशरथे, हा आपला शत्रु सिंधुराज मोठ्या गर्वाने भाज आपल्या पुढे आला आहे व आपल्यावर शस्त्रप्रहार करण्यासही तयार झाला आहे, असे पाहून विदूरथास फार कोप आला. त्याने आपलें विशाल धनुष्य आकर्ण ओढून त्याच्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला. भति क्रोध आल्यामुळे त्याला तेव्हां देहभानही राहिले नव्हते. तिकडे सिंधुराजा नेही त्याच्या त्या भयकर वर्षावास प्रतिबंध करण्याचा सकल्प करून वेगाने शरसंधान करण्यास आरभ केला. विदूरथाप्रमाणेच तोही मोठा शू व भगवान् विष्णूचा पूर्ण भक्त असल्यामुळे त्या दोघांचे युद्ध प्रेक्षणीय हो व कौशल्य अपूर्व होते. त्याचे ते बाण मणजे मुसळेच होती, असे मण ण्यास काही प्रत्यवाय नाही. त्यांनी एकमेकाच्या शस्त्रांस अंतरिक्षांतच तोड़