या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९२ बृहद्योगवासिष्ठसार. ही माझी भार्या आहे. ही माझी सहज सखी आहे. ही माझी राणी आहे. हा माझा सेवकवर्ग आहे. हे माझे राज्य. सेवकादिकही उलट हा आमचा राजा, ही आमची राणी इत्यादि जाणतात. पण यातील गुप्त रहस्य व इतके वेळ तू पाहिलेला चमत्कार मला, तुला व हिला मात्र ठाऊक आहे. ही स्थूल शरीराने पतीजवळ गेली नाही व माझ्या वरानेही जाऊ शकली नसती. कारण अति पुण्याच्या योगानेच प्राप्त होणाऱ्या लोकास आत्मबोधशून्य जीव जात नाहीत. स्वदेहाने तेथे जाण्यास ते असमर्थ असतात. हिरण्यगर्भादि जगाच्या अधिका-यानी ही नियतीच ठरवून सोडिली आहे त्यामुळे सत्य लोकाशी स्थूल शरीरादि असत्य पदार्थाचा सबध होऊ शकत नाही. बालकाच्या मनात वेताला- विषयीचा सकल्प असेपर्यत भीतीचा नाश होत नाही. चित्तात अवि- वेकरूपी ज्वर असेपर्यंत विवेक-चद्रमा शितलता उत्पन्न करण्यास समर्थ होत नाही. त्याचप्रमाणे मी पार्थिव शरीररूप आहे, माझी अतरिक्षात गति होणे शक्य नाही असा ज्याच्या मनात निश्चय असतो त्यास त्याच्या विपरीत कार्य करिता येत नाही. यास्तव ज्ञान, विवेक, पुण्य व वर याच्या योगाने पुण्यकारक अशा या तुझ्या देहासारिख्या सूक्ष्म देहाने जीव परलोकी जातात. पेटलेल्या अग्नीत वाळलेले पान टाकिले असता ते जसे लागलेच जळून जाते त्याप्रमाणे ' हा स्थूल देह मी आहे ' हा अहकार सोडून मोठ्या पुण्याच्या प्रभावाने जीव आतिवाहिक देहरूप झाला की स्थूल भावाची निवृत्ति होते. वर व शाप सुद्धा प्राक्तन वासनाकर्मानुसारीच असतात म्हणजे वराप्रमाणे आपलें इष्ट होणे अथवा शापाप्रमाणे अनिष्ट होणे ही दोन्ही पूर्व कर्माचीच फळे आहेत. मग असे जर आहे तर देवादिकाच्या वराची किवा शापाची काय आवश्यकता आहे ? म्हणून म्हणशील तर सागते. वर व शाप हे केवल त्या त्या फळाचे स्मरण करून देणारे आहेत. एकाद्या बालकाने एकादा अनुवाक किवा श्लोक तोडपाठ केलेला असला तरी तो त्याला कोणी विचारला असता एकाएकी आठवत नाही. पण एकाद्या अधिक जाणत्याने त्याचे मूळ त्याला आठवून दिले म्हणजे त्याला स्मरण होऊन ती पुढे बिनचुक सर्व म्हणतो त्याप्रमाणे कर्म व वासना याच्या अनुरूप प्राप्त होणारे फळ, वर किवा शाप देणारे अधिक ज्ञानी देव किवा ब्राह्मण, आठवून देतात व त्याप्रमाणे भोक्त्यास