या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९६ वृहद्योगवासिष्टसार. हाच नियतीचा विपर्यास होत नाही, हे ठरविण्यास, योग्य दृष्टात आहे. जीवन-नियतीचा मरणनियतीन्या योगाने बाध होतो, असे तू ह्मणशील तर त्याचे कारण असे आहे की, जीवन व मरण हे परस्पर विरोधी भाव आहेत त्यामुळे त्यातील एकाचा विपर्यास झाल्यावाचून दुसऱ्याचा उद्भव होऊ शकत नाही पण ज्या पदार्थामध्ये असा प्रतिपक्षभाव नसतो ते मतत एकमारिखे असतात पण एवढावेळ नियतीविषयी जे मी तुला सागितले ते मुद्धा मायिक दृष्टीने सागितले आहे. परमार्थ दृष्टीने जग मुळी उत्पन्नच झालेले नसल्यामुळे जे हे सर्व आपल्या अनु- भवाम येत आहे ते सर्व चिदाकाश आहे व स्वप्नातील स्त्रीमग्वाप्रमाणेच ते असत् आहे तेव्हा त्यातील नियतीविषयी किवा अनियतीविषयी वाट करणे व्यर्थ होय हे असत्य जगच सत्य असल्यासा- रिग्वे भासत आहे, असे निश्चयपूर्वक जाणणे हीच स्वरूप प्राप्ति आहे व हाच बोध आहे नियति या शब्दाचा अर्थ जरी पाहिला तरी हीच गोष्ठ सिद्ध होते. कारण सर्गाच्या आरभी हिरण्यगर्भाच्या माया वृत्तीत जसा भाव उद्भवला तसाच तो अद्यापि अबावितपणे चालणे यासच नियति मणतात सृष्टीत काही विरोधी भावही आहेत जसे-जन्म(जीवन) व मरण गीत व उष्ण, क्रिया व कारक इत्यादि पण त्यामध्येही विरोधित्वाच। नियम अबाधित आहेच ( सृष्टीच्या आरभी चिदाफाश केवल सकल्पाने आकाशादिरूप कसे होते, हे वर सांगितलेच आहे ) तात्पर्य हा सर्व चिदाकाशाचा विवर्त आहे व त्यामळे जगाचा भास झणजे गद्ध स्वप्न- भासच होय ( य प्रमाणे इतर नियतीची सिद्धि करून जीवननियतिही कर्म, युगभेद व ईश्वरसकल्प याच्या योगाने निश्चित आहे. त्यामुळे मर- णाच्या योगाने जीवननियतीचा भग होत नाही, असे सागण्याकरिता आता अगोदर कर्मफलान्या अनुभवाचा क्रम देवी सागते.-) मरणापर्यंत प्रारब्ध कर्माचे प्राबल्य असते. ह्या जन्मास व त्यातील सुखदु खादिकास कारण झालेले जे कर्म ते प्रारब्ध कर्म होय. त्याचा क्षय होताच देहपात होतो. (हणजे मरण येते. ) त्याचे प्राबल्य असेपर्यत वर्तमान देहाने केलेली साधारण कमें आपले फल देण्यास समर्थ नसतात. कारण प्रबल प्रारब्ध त्याच्या फलास प्रतिबध करिते. पण मरण येताच प्रारब्धाचा प्रतिबंध रहात नाही व त्यामुळे अनेक जन्मातील सचित कर्मापैकी प्रबल