या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५४. ३०१ असते व कधी कधी राग-द्वेषादि-जीवधर्मानी मलिन होते. दूर्वा, जाई. कुद इत्यादिकाच्या वेलास जसे मध्ये मध्ये फाटे फुटलेले असतात व थोड- योड्या अतराने दुसऱ्या शाग्वाही फुटतात त्याप्रमाणे चेतनसत्तंस अनेक जन्म व मरण या शाखा फुटतात. पण हे सर्व अविद्या दृष्टीने खरे आहे. परमार्थ दृष्टीने पाहिल्यास चेतन पुरुष कधीही उत्पन्न होत नाही व मर- तही नाही. तर स्वप्नभ्रमाप्रमाणे हा केवल भ्रम आहे, असे अनुभवास येते. तो मरणधर्मी नाही, हा सिद्धात युक्तीनेही सिद्ध करिता येतो. तो कसा ह्मणून विचारशील तर सागत्ये. सर्व प्राण्यामध्ये चेतन व जड असे दोन भाग आढळतात. तेव्हा त्यातील पुरुप कोण ? चेतन-व्यतिरिक्त पुरुष आहे, असे मटल्यास देह, इद्रिये, मन, बुद्धि, अहकार, चित्त, त्याच्या अधिष्ठात्री देवता, व अविद्या ही सर्व चेतनभिन्न असल्यामुळे त्यातील कोणाला पुरुप ह्मणावयाचे ते समजले पाहिजे. पण कोणालाही जरी पुरुष मानिले तरी ती सर्व जड असल्यामुळे त्याचा व्यवहार स्वतत्रपणे होत नाही तर त्याना नेहमी चेतनाच्या आश्रयानेच सर्व व्यवहार करावा लागतो. तेव्हा असत्या परप्रकाश पदार्थातील कोणालाही पुरुष ह्मणता येत नाही. यास्तव अवशिष्ट राहिलेल्या प्राण्याच्या चेतनामात्र भागासच पुरुष ह्मणावे लागते. पण पुरुप चेतन आहे, असे हटल्यावर तो केव्हा व कोठे नाश पावतो ते सागितले पाहिजे. त्यावाचून त्याचा नाश सिद्ध होत नाही. त्याचा नाश पाहणारा कोणी तरी पाहिजे. पाहणाराच जर नाही तर कोणत्याही क्रियेची अथवा विकाराची सिद्धि होत नाही, हे सर्वास ठाऊकच आहे. कारण एकादे काही झाले. पण त्याला कोणी पाहिलेच नाही तर त्याचे होणे काय कामाचे । ते झाले असे कशावरून ठरणार ? समजा की, आकाशातून एक फळ पडले, किवा एक मोठा ध्वनि झाला पण त्याला कोणी पाहिले किवा ऐकिले नाही तर त्या फलाची अथवा ध्वनीची सिद्धि हाईल काय ? नाही त्याचप्रमागे चेतन पुरुप मरतो, असे हटत्यास त्याचे मरण कोणी पाहिले, हे गितले पाहिजे. पण या अनादि ससारात आजपर्यंत कोणीही ते पाहिलेले नाही व जरी त्याचा नाश झाला तरी चेतनाच्या नाशानतर सर्वच जड रहात अस- ल्यामुळे तो अनुभवास येणे शक्य नाही. शिवाय मरण झणजे काय हेही एकदा स्पष्ट कळले पाहिजे. मरण ह्मणजे विनाश की, एक देह