या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५५. ३०७ गून वायु, वृष्टि इत्यादिकाच्या द्वारा भूमीवर येऊन व्रीही, यव, इत्यादिरूप होतात. नतर ज्या कुलात स्वकर्मानुरूप जन्म घ्यावयाचा असेल त्यातील पुरुषाच्या शरीरात अन्नरूपाने प्रवेश करून रेतोरूप होऊन रहातात पुढे आईबापाच्या ग्राम्य धर्माने मातेच्या उदरात जाऊन तेथे सशरीरी होतात. चवथ्या प्रकारच्या सामान्य पुण्यवानाचीही प्रायः अशीच, पण किचित् न्यून प्रमाणाने सुखरूप गात होते. माराश मृत पुरुष मरणमूर्चेनतर क्रमाने किवा अक्रमाने (क्रमाची अपेक्षा न करिता एकदम ) आपल्या वासने- प्रमाणे या अवस्थाचा अनुभव घेतात. (आता मरणापुढे ते कोणत्या क्रमाने आरोप करितात तें विशेषण देऊन देवी दाखविते. ) प्रथमत आह्मी मेलों, असे त्यास वाटते. नतर क्रमाने पुत्रादि अधिकारी परुषानी बारा दिवसापर्यंत पिडदानादि क्रिया केली असता आह्मी आता शरीरया झालों आहो, असे ते समजतात. नतर पुत्रादिकानी तेराव्या दिवशी केलेल्या पाथेय श्राद्धाने तृप्त होऊन आता आमी यमपुरास जात आहो. कालपाशानी युक्त असलेले यमदूत आमास नेत आहेत, असे त्यास वाटते. त्यात जे उत्तम पुण्यवान् असतात त्यास जाताना मार्गात स्वकर्मोपात्त उत्तमोत्तम विमाने, उद्याने इत्यादि आनददायी वस्तु प्राप्त होतात व जे पापी असतात त्यास अति असह्य थडीने युक्त असलेले प्रदेश, काटे, खळगे, शस्त्रासारख्या तीक्ष्ण पानानी युक्त असलेल्या वृक्षाची अरण्ये इत्यादि स्वकर्मानुरूप प्राप्त होतात व त्यातून पुढे जाताना त्यास अतिशय दुख सहन करावे लागते. जो मध्यम पुण्यवान् असतो त्यास " हा माझा मार्ग सुखावह आहे; याच्या दोन्ही बाजूस हिरवे गवत उगवले आहे, मव्ये शीतल छाया आहे, ठिकठिकाणी सुदर जलाशय आहेत ” इत्यादि सामान्य सुखदायक वस्तू आढळतात. मी आता यमपुरास आलो आहे. हा तो सर्वलोकास ठाऊक असलेला येथील यमराज होय. याच्यापुढे माझ्या कर्माचा विचार होत आहे, इत्यादि त्यास अनुभव येतो. पण हा आरो- पाचा क्रम सर्वाचा एकसारखाच नसतो. कारण प्रत्येकाचे कर्म भिन्न भिन्न असल्यामुळे कर्माप्रमाणे होणारा तो आरोपही भिन्न भिन्न प्रकारचा होतो. प्रत्येकाचे स्वप्न जसे निरनिराळे तसाच प्रत्येकाचा हा भासुर भारोप-क्रमही निराळा. पण स्वरूपदृष्टया पाहिल्यास आत्म्याहून मिन काही नाही, असे अनुभवास येते. असो; नतर-आतां यमाने मला