या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१० बृहद्योगवासिष्ठसार. त्याचा सत्यसकल्पच जगाच्या स्थितीचे कारण आहे. त्यामुळे त्याच्या सकल्पान्या सत्तेनेच जगाची सत्ता बनली आहे. त्या आद्य प्रजापतीचा पहिला साकल्पिक परिस्पद ( विवर्त) हे पदार्थाचे बिब आहे व त्याचे हे प्रतिबिबच अद्यापि स्थित आहे आता या पदार्थामध्ये स्थावर-जंगम भेद कसा होतो, तें सागत्ये. देहामध्ये जे छिद्रमय स्थान आहे त्यात वायु प्रवेश करितो व शरीराकडून हालचाल करवितो. त्यामुळे हा प्राणी जीवत आहे, असे व्यवहारचतुर ह्मणतात. सृष्टीच्या आरभी परमात्म्याने जगमप्राण्याविषयी ही अशी स्थिति नियत केली आहे. त्यामुळे है वृक्षादिक प्राणी चेतन असूनही स्पदरहित (निश्चेष्ट ) असतात. आता चेतन व अचेतन अशी कल्पना करण्याचे कारण सागते. हा चिदा- काश ईश्वरच अतःकरणरूप उपाधीमध्ये प्रतिबिबित झाल्या कारणाने जणुं काय अशरूपाने व्यक्त झाला आहे, असे वाटते. तोच त्याचा आपाधिक जीवभाव होय (ह्मणजे ईश्वर अतःकरणात जीवरूपाने व्यक्त होतो.) अशा रीतीने तो ज्यात व्यक्त होतो त्या पदार्थास चेतन ह्मणतात व अंतः- करणान्या अभावी तो ज्यात व्यक्त होत नाही त्यास अचेतन समजतात. ( तो परमात्मा बुद्धीच्या द्वारा स्थूल शरीरात प्रवेश करून नेत्रादि इद्रियाच्या दारा बाह्य व्यवहार करण्यास समर्थ होतो. असें आता देवी सागत्ये.-) वुद्धीमध्ये प्रतिबिब रूपाने प्रविष्ट झालेले चैतन्य नरशरी- रादिरूप दुसन्या नगरात प्रवेश करून चिदाभासयुक्त बुद्धीस नेत्रादि इद्रियगोलाकडे नेते व त्यातून बाहेर पडून बुद्धिवृत्तीस विषयापर्यत पसरावयास लाविते व अत करणापासून, इद्रियाच्या द्वारा, विषयापर्यंत पसरलेल्या बुद्धीवृत्तीच्या योगाने बाह्य विषयाचा अनुभव घेतें. आता तू कदाचित् ह्मणशील की, नेत्रादि इद्रिये साक्षात् चैतन्याचे ठायीं आरोपित असल्यामुळे स्वत चैतन्यमय असतात व तीच जीव- रूपाने शरीरात बसून व्यवहार करितात. असे झटल्यानेही बाह्यव्यव- हाराची व्यवस्था लागत असल्यामुळे निराळ्या जीवाची कल्पना करण्याचे काही प्रयोजन नाही. पण ते बरोबर नाही. कारण इदियें स्वतःच जीवभूत नसतात. केवल चैतन्याचे ठायीं अध्यारोप झाल्यानेच जीवभाव येत नसतो. कारण तसे जर असते तर सर्वच जग चैतन्याचे ठायीं आरोपित असल्यामुळे सर्वच सचेतन (जीव) झाले असते. घट, वस्त्र