या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ५५. इत्यादि अचेतन काहींच नसते. यास्तव ईश्वराचे ठायीं जीवभाव आण- णारी बुद्धि आहे. पण बुद्धीनेच जीवाची उपाधि व्हावे, असा नियम असण्याचे कारण काय ? म्हणून म्हणशील तर आकाशाने शून्यशक्तियुक्त असावे; वायूने स्पदशक्तियुक्त असावे, पृथ्वीने सर्वास धारण करण्याच्या सामाने सपन्न असावे इत्यादि सवेवस्तुशक्ति-व्यवस्थापक ( सर्व वस्तूच्या शक्तीची व्यवस्था करणारा ) चित्मकल्पच त्याचे कारण आहे, असे मी सागेन. कारण त्याच्या सकल्पाप्रमाणे सर्व होत असते. तात्पर्य अशारीतीने तो परमात्मा सर्व शरीररूप होऊन जगमाची जगमरूपाने व स्थावराची स्थावररूपाने भावना करीत तात्काल त्या त्या रूपाने विवृत्त होतो व तेच त्याचे साकल्पिक रूप तसेच सदा रहाते. पण वस्तुत. जड व चेतन हे भिन्न पदार्थ नाहीत. कारण त्यांचा तो भेद बुद्धि या उपाधीमुळे होत असतो. त्याची वृक्ष पाषाण इत्यादि नावेही बुद्धि-कल्पित आहेत. तो सर्व प्रत्यक्-सवित्चा विलास आहे. त्याचप्रमाणे कृमि, कीट, पतग इत्यादिकाच्या आत असलेली जी सवित् तीच बुद्धि, शब्द, न्याचा अर्थ इत्यादि सर्व होते. कारण उत्तरसमुद्राच्या तीरी असलेल्या प्राण्यास दक्षिण समुद्राच्या तीरावरील स्थावर-जगम पदार्थ, त्याच्याविष- यींची संवत् उत्पन्न न झाल्याकारणाने, तेथून दिसत नाहीत. पण त्यानी आपल्या चित्तात त्याची कल्पना केल्यास त्यास तेथूनच त्याचा अनुभव येतो. पण दक्षिणतीरस्थ लोकास उत्तरतीरस्थाचा त्याच वेळी अनुभव येत नाही. कारण त्याचे चित्त दुसन्या व्यवहारात गुतलेले असते. तात्पर्य सर्व स्थावर- जगम पदार्थ ज्याच्या त्याच्या प्रत्यक् साक्षी अनुभवात साठविलेले आहेत. एकाच्या बुद्धीने कल्पिलेले दुसन्यास कळत नाही. एवढ्या साठीच पुष्कळानी मिळून एकादें कार्य करावयाचे असल्यास पूर्वी सकेत करून परस्परास परस्पराचा अभिप्राय कळवावा लागतो. त्यावाचून सर्वाची एकसारखी क्रिया होत नाहीं माराश मचिदानदरूप ब्रह्माचे ठायीं असत्त्व, जाड्य, वायु, आकाश इत्यादिकाची कल्पना होणेही अयोग्य आहे. तस्मात् हे सर्व भान चित्ताच्या अधीन आहे, असे तू समज. प्रलय काली मायेमध्ये लीन झालेले सर्वात्मक व सर्वगत समष्टि चित्त सृष्टीच्या आरभी सर्व प्रत्यक्-भूत चिदाकाशाच्या आराधाने जसे जसें विकसित होते तसेच ते कल्पाच्या अंतापर्यंत रहाते. प्रथम