या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१२ बृहद्योगवासिष्ठसार. सर्गात जे जसे झाले असेल तसेच ते महाप्रलयापर्यंत पुनः पुनः होत रहाते. स्थावर व जगम या दोन्ही प्रकारन्या पदार्थांमध्ये चित्त असते. पण स्थावरात चेष्टा करविणारा प्राण वायु नसतो. त्यामुळे त्याचा भेद झाला आहे. असो; लीले, हे सर्व सत्य असल्यासारखे दिसणारे विश्व स्वप्नतुल्य असत्य कसे आहे, तें मी तुला सागितले. हा पहा राजा विदूरथ मरून पुष्पाच्या राशीत असलेल्या पद्माच्या शवात शिरण्याकरितां जात आहे, असे वाटते. म. लीला-हे देवेशि, हा शवमडपास कोणमा मार्गाने जातो तें आपग याच्या मागोमाग जाऊन पाहू या, चल. श्रीदेवी-पद्मशरीरच मी आहे, अशी वासना धरून व तिच्या अनु- रोधाने, हा मी कोटें दूर असलेल्या परलोकास जात आहे, असें सम- जून तो स्वकल्पित मार्गाने जाईल. आह्मास त्याच्याच मार्गाने गेले पाहिजे, असे नाही. पण तुझ्या इच्छेप्रमाणे मला केले पाहिजे. कारण परस्पर मनोभग केल्यावर स्नेह टिकत नाही. यास्तव तू ह्मणशील तिकडून मी येण्यास तयार आहे. श्रीवसिष्ठ-राघवा, याप्रमाणे सभाषण करून लीला सदेहरहित ज्ञानयुक्त झाली. इतक्यात विदूरथाचे चित्त प्राज्ञात्म्यामध्ये लीन झाल्या गरणाने तोही देहरूपाने जड होऊन पडला ५५ मर्ग ५६-या सर्गामध्ये राजाचे वासनामय रामपुरास गमन व त्या दोघी सुंदर स्त्रियाचे त्याच्या मागोमाग आपल्या पूर्व नगरास आगमन याचे वर्णन केले आहे श्रीवसिष्ठ-राघवा, प्राणवायु असेपर्यत या शरीरास सर्व शोभा असते. तो एकदा गेला ह्मणजे ते अति पापी, अति भ्रष्ट, अति अमगल व अति कुरूप बनतें राजा विदूरथाच्या शरीराचीही तीच अवस्था झाली. त्याचे डोळे पाढरे झाले. मुख निस्तेज झाले. महामरणमूछा- रूपी अधकूपामध्ये पडल्याप्रमाणे त्याचे चित्त विवेकशून्य झाले त्यामुळे चित्रातील देहाप्रमाणे त्याचा देह निश्चेष्ट झाला. असो; उगीच फार बोलून काय करावयाचे आहे ? एकादा वृक्ष मोडून पडत आहे, असे कळताच त्यावरील पक्षी जसे भाकाशात उडून जातात त्याप्रमाणे त्याच्या