या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ बृहद्योगवासिष्ठसार. श्रीराम-भगवन् विदूरथाच्या लीलेस ( म. तिच्या जीवास ) पूर्वी तिच्या कन्येने मार्ग दाखविला. पण विदूरथाच्या जीवास येथे मार्ग दाखवि- णारे कोणी नव्हते. तेव्हां त्याला परत येण्याचा मार्ग कसा समजला ? श्रीवसिष्ठ-राघवा, पूर्वशरीरवासना क्षीण झालेली नसतानाच बलाढ्य प्रारब्धामुळे त्यास जन्मातराची भावना झाली व भोगाच्या योगाने त्या प्रारब्धाचा क्षय झाल्याकारणाने ती पूर्व वासना पुनः उद्भवली. त्यामुळे त्याला पूर्वशरीरात येण्याचा माग सागणारा कोणी लागला नाही. त्याला तो पूर्व गमनागमनान्या अभ्यासामुळे ठाऊक होता. अर्थात् पद्मश- शरीरच मी आहे, अशा त-हेच्या अहभावरूप जीवाच्या हृदयात त्या शरीराकडे येण्याचा मार्ग आपोआप स्फुरण पावला. जीवाच्या सूक्ष्म अंतःकरणोपाधींत व्यक्त झालेल्या वासनारूपाने स्थित असलेले जगच त्यास प्रत्यक्ष दिसत असते ज्याप्रमाणे वटबीजास भूमि, जल, इत्यादि अकुराच्या सामग्रीची प्राप्ति झाली असता, आपोआप अकुररूपाने उत्पन्न होणा-या वटतरूचा अनुभव जीवास आतल्याआत येतो त्याप्रमाणे स्वभावभूत चित्-अणु त्रैलोक्यसमूहाचा अनुभव अतःकरणातच घेतो.(ज्ञान किंवा अज्ञान याच्या द्वारा सर्व जग साक्षिभास्य आहे ह्मणजे साक्षि चेतनात्म्यास जगाचा जो भाग ज्ञात असतो त्यास ते ज्ञात या रूपाने प्रकाशित करिते व जो अज्ञात असतो त्यास अज्ञात या रूपाने तें व्यक्त करिते, असा याचा भावार्थ.) पुरुष जरी दूर कोठे असला तरी भूमीमध्ये स्वतः पुरून ठेविलेले आपले धन तो मनाने सदा पहात असतो. अथवा एकादा विषयी पुरुष आपल्या दूर असलेल्या कामीनीचे चितन करीत असताना तन्मय झालेल्या त्याला तिचे साक्षात् दर्शन झाल्याचेही भान होते. त्याप्रमाणेच जीवाने शेकडो जन्म घेऊन नानाप्र- कारचे भ्रम जरी अनुभविले तरी त्यास आपल्या वासनेत असलेले अभीष्ट दिसते. श्रीराम-भगवन, आप्तांनी पिंडप्रदानादि क्रिया केल्यामुळे, विदूर- थाच्या जीवास, भापलें शरीर बनले आहे, असे दिसले, असे आपण मला आता सागितलेत. पण सर्वांचेच आप्त सर्वांस उद्देशून पिंडादि देत बसतात, असे आढळत नाही व ज्याला पिड दिलेले नसतात त्याला