या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२८ बृहद्योगवासिष्ठसार. " हे सरस्वति देवि, तुला नमस्कार असो. हे सर्व-हितप्रदे, मला विद्या व परमार्थ यास धारण करणारी बद्धि, दीर्घ आयुष्य, व धन दे." तें ऐकताच देवीने त्याच्या मस्तकावर हात ठेविला व झटले, " पुत्रा, तुला ऐहिक व पारलौकिक इष्ट अर्थ प्राप्त होवोत. तुझ्या सर्व आपत्ति व पाप- बुद्धि नष्ट होवोत. तुझा अनेक प्रकारे अभ्युदय होवो, तुझ्या राज्या- तील लोक सुखी राहोत व तुझ्या या गृहामध्ये सपत्ति सदा वास करो ५८. सर्ग ५९-या सर्गत-राजा जिवत झाला, असे ऐकून नगरातील लोकानीं केलेला ___ उत्सव, त्या जीवन्मुक्ताचे चिरकाल राज्य व मुक्ति याचे वर्णन करितात. श्रीवसिष्ठ-रामचद्रा, असा वर देऊन ती देवी तेथेच गुप्त झाली व इतक्यात प्रभात झाल्याकारणाने पद्माच्या नगरातील सर्व लोक जाग झाले. लीला मे ठ्या आनदाने त्या नृतन लीलेस व मरून पुन जिवत झालेल्या आपल्या प्राणनाथास पुन पुन: आलिंगन देऊ लागली राजा- च्या मदिरात मोटा आनदोत्सव सुरू झाला नृत्य, गायन, वाद्य-वादन, स्तुतिपाठ, पुष्पवर्षाव, मगलकृत्ये, दाने, देणग्या, इत्यादिकाची त्या राज- मादिरात व नगरात एकच गर्दी झाली पद्माची कीर्ति सर्वत्र पसरली. सरस्वती देवीच्या कृपेने तो पन' जीवत झाला, ही वातो आबाल वृद्धाच्या तोडी झाली सर्व आनढसागरात निमग्न झाले. गजानेही ठीलच्या मुग्वाने सर्व वृत्तात ऐकिला व त्यालाही वर वर पाहणारास अतिरमणीय वाटणाऱ्या ससाराचे तत्त्व समजले. ब्राह्मणानी राजास व त्याच्या पत्नीस शुभ आशीर्वाद दिले. नतर चारी समुद्रातून व तीर्थातून आणलेल्या जलाने मत्री, ब्राह्मण, माडलिक राजे व सेनापती या सर्वानी त्यास सिंहासनावर पुन अभिषेक केला. नतर परलोकातून परत आलेला महा बुद्धिमान् जीवन्मुक्त राजा पद्म व दोघी लीला अशी ती पूर्व वृत्तात सागत राममाण झाली. सरस्वतीच्या प्रसादाने व देवीची आराधना करणे इत्यादि स्वपौरुषाने त्या राजास येणेप्रमाणे परम प्रशस्त जीवितं, राज्य, व ज्ञान प्राप्त झाले. ज्ञप्तीच्या उपदेशामुळे ज्याला आत्मतत्त्व समजले आहे असा तो राजा ऐशी सहस्रवर्षे राज्याचा उपभोग घेता झाला. ते त्याचे राज्य प्रजेच्या अभ्युदयानी निर्दोष होते. त्यातील विद्वान् शास्त्रा- नुरूप वर्तन करीत असल्यामुळे ते रमणीय होते; कुलपरपरेने युक्त होते;