या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६०. ३२९ भोग, यश व धर्म यास कारण होणारे ते सर्वास हितकर होते व जन- मनोरजक असलेले ते सर्वास सतोप देणारे होते. साराश अशाप्रकारच्या त्या स्वाराज्याचा दीर्घकाल उपभोग घेऊन ती दोघे विदेह कैवल्यास प्राप्त झाली. (दुसरी लीला पहिल्या लीलेच्या प्रतिबिबरूप असल्यामुळे येथे टोघे असे लटले आहे ) ५९. सर्ग ६० --या सगात अगोदर लीलाख्यानाचे प्रयोजन सागून कालादिकाच्या साम्य-वैषम्याच कारण सागतात श्रीवसिष्ठ--राघवा, " दृश्य आहे," असा जो तुला भ्रम झाला आहे याचे निवारण करण्याकरिता मी हे सुदर लीलोपाख्यान मागितले. आता त्याचा चागला विचार करून जगाची सत्यता टाक जगत्सत्ता शात झाली की, दृश्यनिवृत्ति आपोआप होते. कारण सत्यवरतूचे मार्जन (निवृत्ति) जसे अशक्य व दुर्घट असते तसे असत्य वस्तूचे नमते. तत्त्वज्ञ दृश्य व द्रष्टा याचे ऐक्य जाणतो. कारण सृष्टीच्या आरभीही हिरण्यगर्भाने आपल्या चिन्छनीच्या कल्पनेनेच हे पृथिव्यादि पदार्थ निमाण केले, हे ता विसरत नाही. (गारा व वफाचे तुकडे वस्तुतः जरी द्रवरूप असले तरी काही कारणाने ते घनरूप दिसतात पण त्याच्या त्या आपाविक घनरूपतेमुळे स्वाभाविक द्रवरूपत्व नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे हे घन दृश्य सविद्रुप आहे त्याच घनत्व औपाविक असून सविद्रूपत्व स्वाभाविक आहे. ) साराश, दृश्य ही भ्राति आहे तिला स्वत ची सत्ता नाही. तिला काही नियम नाहा व तिच्याविषयी आस्था बाळगणेही फारसे योग्य नाही मायादृष्टि असेपर्यंत ते अमते व मायापटल जाऊन परमार्थ- दृष्टि प्राप्त झाली की, ते नाहीसे होत श्रीराम-अहाहा । विप्रवये, आपण मला या आख्यानाच्या द्वारा परम दृष्टि दिलीत पुष्कळ दिवमानी हे ज्ञातव्य आज मला कळले. गुरुराज, या आख्यानश्रवणाने माझे चित्त शात झाले. आपल्या वाणीने या श्रोत्रेद्रियास पवित्र करण्याचा हा योग फारच मोठ्या पुण्यसचयामुळे आला, यात सशय नाही. पण श्रवणाविषयी माझी उत्सुकता वाढत चालली आहे. यास्तव गुरुवर्य-माझ्या या सशयाची निवृत्ति करावी. वसिष्ठ ब्राह्मण, पद्म व विदूरथ याचे तीन मग आपण मला मागितलेत. पण त्यात गेलेला काल कोठे भाठ दिवस, तर कोठे मास; कोटे अनेक वर्षे, तर कोटें क्षण;