या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग ६०. ३३१ न्याचे ठायी कल्पक जीव आपल्या संस्काराप्रमाणे जशी जशी कल्पना करितात तसा तसा अनुभव येतो. कोणी एकादा ज्या चैतन्यास निर्मप समजतो त्यालाच दुमरा कल्प मानतो चार प्रहर प्रमाणाची रात्र दुःग्विताम वर्षासारखी वाटते व मुखितास क्षणासारखी भासते. रामा, याविषयी अधिक सागण्याची आवश्यकताच नाही. कारण, आपणाला म्वान अनुभव, पुराणातील हरि चद्रादिकाच्या कथा इ यादिकावरून ते महज ममजण्यासारखे आहे. मनुचे जे आयुष्य तोच प्रजापतीचा एक क्षण, प्रजापतीचा आयुःकाल हागजे चक्रपाणीचा एक दिवस, विष्णूची आयु- मयादा ह्मणजे शकराचा एक वार व ध्यानामध्ये लीन झाल्याकारणाने न्याचे चित्तच क्षीण होऊन गेले आहे त्याला दिवसही नाहीत व रात्रीही नाहीत आत्म्यामध्ये निमग्न झालेल्या योग्यास तर हे पदार्थ व हे जगही नाही तेव्हा आता तू या कालाविषयी काय समजणार ? तो सत्य आहे असे मणणार की असत्य आहे, काल्पनिक आहे, इत्यादि समजणार । रामा आपल्या या भूलोकीच पाहिनास। एके ठिकाणी जेव्हा दिवस असतो तेव्हा दुसऱ्या ठिकाणी रात्र अमते, एके ठिकाणचे लोक आता मध्याह्न काल झाला आहे, असे समजतात व त्याचवेळी दसऱ्या ठिकाणी लोक मायकाल झाला ह्मणून दीपादिकास प्रकाशित करू लागतात. कोणी आज आमचा पाडवा आहे, दिवाळी आहे, दमग आहे ह्मणून आनंद करितात तर दुसरे त्याच दिवशी उदासीन किवा दुःखी असतात साराश, काल कल्पनामय आहे. पशु, पक्षी, मत्स्य, कीट, इत्यादिकाच्या कालाविषयीं तर बोलावयासच नको. त्याना कल्पना करण्याचेच सामर्थ्य नसल्यामुळे त्याना क्षणही नाही व कल्पही नाही अथवा त्याना नेहमीच कल्प व नेहमीच क्षण आहेत. बाबारे, कल्पनावशात् प्रिय वस्तुही अप्रिय हाते व अप्रियवस्तु प्रिय होते. इद्रिये, मन, प्राण इत्या- दिकाचा निरोध करावयास जेव्हा आपण प्रथम आरभ करितो तेव्हा किती कष्ट होतात बरें ? पण अभ्यासाने त्यापासूनच पुढे आनद होतो. विषयलपट पुरुषास गुरु, शास्त्र, त्यानी सागितलेले अनुष्ठान, जप इत्यादि सर्व प्रथम दु.खदायी वाटतात; पण पुढे सवयीने त्याच्या पासूनच परम सुख मिळते. आईबापे बालकाची शेडी ठेवण्याचा उत्सव करितात. पण तें अर्भक मोठमोठ्याने आक्रोश करिते. तात्पर्य सर्व काही भावनेच्या अधीन आहे.