या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२३८ बृहद्योगवासिष्ठसार. सापडत नाही. तर मग अनुभवास येणारा विषय-आकार कोणाचा? ह्मणून ह्मणशील तर सागतो. तो वृत्तीचा होय. वृत्ति ह्मणजे अंतःकारणा- पासून विषयापर्यंत इद्रियाच्या द्वारा प्रवाहासारखा चालणारा एकप्रकारचा सूक्ष्म चित्तपरिणाम. साराश चैतन्याचा भेद असिद्ध आहे. त्याचप्रमाणे जडाच्या भेदाचेही निरसन करिता येते. ते कसे ह्मणून विचारशील तर सागतो. हा घट, हे पुस्तक, ही लेखणी इत्यादि भिन्न पदार्थाचा अनु- भव चैतन्यावाचून येत नाही. त्यामुळे चैतन्याच्या सत्तेनेच सत्तायुक्त होणारे ते वस्तुतः भिन्न कसे ? हे मोठ्या तार्किकालाही सागता येणे शक्य नाही. एवढ्याकरिताच आह्मी वेदान्ती-सोन्याहून कटकत्व ( कडेपणा) ङ्केप जलाएन तरगत्व जसे भिन्न सभवत नाही, त्याप्रमाणे जग ईश्वराहन भिन्न असणे सभवत नाहीं-असे नेहमी ह्मणत असतो. श्रीराम-पण, विद्वद्वर्य यावरून कड्याचे जसे सोने कारण आहे त्याप्रमाणेच जगाचे चैतन्यात्मरूप ब्रह्म कारण आहे ? असे नाहीका होत. मग तें कारणावाचून उत्पन्न झाले आहे, असे आपण सागत असता त्याची काय वाट ? श्रीवमिन-अरे वेड्या, जग जर त्याच्याहून भिन्न असते तर त्यातील पूर्वी असणारे ब्रह्म कारण व नतर असणारे जग त्याचे कार्य, असें ह्मणता आले असते. पण ते त्याच्याहून अगदी अभिन्न आहे. एकच वस्तु आपलेंच कारण किंवा कार्य कसे होणार ? तस्मात् हा आत्माच जगद्रप झाला आहे; असे तू जाण. पण त्या ईश्वरामध्ये जगद्रप नसते. सोनेच कडे, कुडल इत्यादि होते पण सोन्यात कटकत्वादि नसते. कारण विवर्त अधिष्ठानाच्या आश्रयाने असतो. पण त्याहून भिन्न नसतो. असें जर आहे तर एकास अनेकरूपता कशी आली ? ह्मणून ह्मणशील तर त्याचे उत्तर असे-व्यावहारिक सत्तेने युक्त असलेल्या शाखा, पाने. हात, पाय इत्यादि अनेक अवयवाशीं व्यावहारिक सत्तायुक्त वृक्ष, देह इत्यादि अवयवीचे तादात्म्य होत असल्याचे जर आह्मी व्यवहारांत प्रत्यहीं पहात आहो तर कल्पित अनेक वस्तूशी वास्तविक ब्रह्माचे तादात्म्य होतें ह्मणून निःशकपणे झणण्यास कोणती भीति आहे ! अथोत् व्यवहारात वृक्ष अवयवदृष्टया जसा खरोखरीच अनेकरूप होतो त्याप्रमाणे एक ब्रह्म काल्पनिक अनेकरूप होते. तर मग सर्वानुभव