या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण–सर्ग ६२. ३४३ भविष्य ती प्राण्याच्या कमोनुरूप ठरवून ठेविते. सारांश परमार्थ दृष्टीने ब्रह्मसत्ता जशी अव्यभिचरित असते त्याप्रमाणे व्यवहारदृष्टया ही नियति अव्यभिचारिणी आहे. झणजे व्यवहारदशेत तिचा बाध होत नाही. पण हे सुद्धा मी व्यावहारिक दृष्टीने सागितले आहे. परमार्थदृष्टया तर ब्रह्म, नियति व सर्ग या शब्दाचा अर्थ मुळीच भिन्न नाही. तर ते सर्व एकाच अर्थाचे वाचक आहेत. तत्त्वज्ञानी अतत्त्वज्ञाच्या बोधाकरिता त्याची कैल्पनी केली आहे. ब्रह्म अचल आहे व सर्ग चल आहे. तेव्हा त्याचे ऐक्य कसे असेल ? ह्मणून ह्मणशील तर सांगतो. वृक्षरहित आकाशात दिस- णाऱ्या वृक्षाप्रमाणे अज्ञदृष्टया अचल ब्रह्मच चल सर्ग आहे, असे भ्रमाने दिसते. ह्मणजे त्याचा वास्तविक भेद नाही. स्फटिकाच्या आत रेघांचे प्रतिबिंब जसे दिसावे त्याप्रमाणे मायाशबल ब्रह्माचे ठायी असणाऱ्या हिरण्यगर्भाने, (निजलेल्या पुरुषाने आपल्या ठायी जसे स्वप्नातील आकाश पहावें त्याप्रमाणे) या नियति सज्ञक भावि सर्गास जाणले. जीव, चैत- न्यस्वभाव असल्यामुळे, शरीराचे अवयव जसे त्याच्या साक्षात् अनुभवास यतात त्याप्रमाणे पनज ब्रह्मदेवाने नियति इत्यादि सर्व सास आपल्या अवयवरूपाने पाहिले. चितुलाच दैव असे ह्मणतात. ही ईश्वरसकल्परूप चित् त्रिकालातील सर्व पदार्थाचे आक्रमण करून राहिली आहे. या पदार्थाने असे स्पदित व्हावे, असे असावे; अशा रीतीने भोक्तृतेस प्राप्त व्हावे इत्यादि दैवसकल्प हाच पुरुषस्पद, हेच तृणगुल्मादि स्थावरजात, हेच सर्वभूतमय जगत् , तोच काल, तीच क्रिया व तेच सर्व काही आहे. प्राण्याचे अदृष्ट या नियतीस साहाय्य करितें व नियति अदृष्टास साह्य करिते. याप्रमाणे या दोन सत्ता एकरूप होऊन रहातात. पण त्या दोन्ही सत्ता पुरुषाच्या प्रयत्नाधीन असतात. कारण नियतीची तशीच मर्यादा आहे. फार काय पण रामा, तू शिष्यभावान मला प्रश्न करावास व मी उपदेश करीन त्याप्रमाणे आचरण करावेस, ही मुद्धा नियतीच होय. दैवपरायण पुरुष दैवाचा आश्रय धरून पौरुष प्रयत्न न करिता आगजर व्रत धारण करून रहातो. पण तेही त्याच्या प्राक्तन कर्मानुरूप बनलेल्या नियतीचच फल होय. पूर्वी जर पुरुष क्रियारहित व केवळ अवस्थेत असता तर बुद्धि, बुद्धिप्रयुक्त कर्म, कर्मप्रयुक्त भूत-भौतिक विकार व गाय, पुरुष इत्यादि विकाराच्या आकृति यातील एक झाले नसते. तर तो (पुरुष)