या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४४ । बृहद्योगवासिष्टसार...anima amithunitamirmirma भापल्या केवल अवस्थेतच असता. पण त्याने क्रिया केली व त्या क्रिय- मुळेच कल्पपर्यंत टिकणारी ही व्यवहार स्थिति नियतिरूपाने परिणाम पावली. या अवश्यभावि नियतांचे उल्लंघन ब्रह्मा-विष्णु-महेशादि ईश्वरास- ही करिता येत नाही. यास्तव या नियतीचा आश्रय करून बुद्धिमानाने पौरुषाचा त्याग करू नये. नियति पौरुषरूपानेच नियामिका होते. वस्तुतः पौरुष व नियति यांचा भेद नाही. तर पौरुषप्रयत्न यारूपानें, उल्लेख न करितां केवल ईश्वरसकल्प या रूपाने जेव्हा त्याचा निर्देश कारतात तेव्हा ती नियति होते व ती नियति पौरुषरूपाने जेव्हा सृष्टीत व्यक्त होऊ लागते तेव्हा तिला पौरुष ह्मणतात. पौरुष प्रयत्नाच्या आकाराने परिणत न झालेली नियति निष्फल असून पौरुषात्मक नियति सफल आहे. ह्मणजे पौरुषापासून पुरुषार्थाचा लाभ होणार. आता आळसी व अजगर-वृत्ति लोकासही भाजनोत्तर तृप्त्यादि फलाचा लाम होतो, हे खरे, पण तेही घास घेणे, चावणे, गिळणे इत्यादि पौरुष प्रयत्नाचेच फळ होय. कारण नियतीच्या योगानेच माझी तृप्ति होईल, असें झणून जो पाषाणासारखा निश्चल होऊन बसतो व घास तोडात घालणे व तो गिळणे इतकाही प्रयत्न करीत नाही, त्यास तृप्ति हे फळ मिळत नाही. तर मग क्षुधित झाल्यावरही क्षुधा निवारणार्थ प्रयत्न न करणारा तो आळशी जिवत कसा रहातो, झणून ह्मणशील तर सागतो. अन्नाच्या अभावीही तो काहीकाल जीवंत रहातो. पण तेंही प्राणाच्या चलनास अनुकूल असलेल्या पौरुष यत्नाचेच फल आहे. कारण श्वासोच्छासही न करिता कोणाही माला रहातां येणे शक्य नाही. चित्तास विश्राति देणान्या प्राणनिरोधाचा अभ्यास करून व तो सिद्ध झाल्यावर प्राणवायूस अति निरुद्ध करून जर कोणी तत्ववित् मुक्त झाला तर तेही प्राणायामादि पौरुषाचेच फल होय. सारांश केवल नियतीचे ह्मणजेच अपौरुषाचेंच काहीएक फल नाही. तर सर्व- प्रकाचे फल पौरुषसाध्यच आहे. तस्मात् शास्त्रीय पौरुषैकपरायण होणे हे साधनांतील परम श्रेयस्कर साधन आहे व नैष्कर्म्यलक्षण मोक्ष हे फलतः श्रेय आहे. या दोन प्रकारच्या श्रेयांच्या योगानें ज्ञानी पुरुषांचा. पक्ष सबल होतो. झणजे तो कार्यासह अविद्येचा नाश करण्यास समर्थ मातो. निर्दु-विता हीच त्याची निति असते. ती प्रमसत्तेची स्फुर्ति