या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं सर्ग ७०. ३६७ काराक्षसी अशी असल्यामुळेच शून्यवादी बौद्धाची जननी झाली माहे. ती माकाशाच्या नीळवर्णासारखीच होती, यात काही संशय नाही. (येथवर आयसीसूचीचे वर्णन करून आता अनायसी जीवसूचीचे वर्णन करितात) असो; दुसरी जीवयुक्त मूची. ती चिदाभासकलनधर्मिणी (चिदाभासास व्यक्त करण्याचे जिचे शील आहे अशी ) असून केवल वासना हेच तिचे सार आहे. ती पाहू गेल्यास दिसत तर नाही, पण नुकत्याच विझलेल्या दीपाच्या वातीस हात लाविला असता ती जसा हातास चटका देते त्याप्र- माणे ही सूचीही नेत्रानी न दिसली तरी तीक्ष्ण आहे. राघवा, भवि- वेकी पुरुष कार्य करितात एका उद्देशाने व त्याचा परिणाम होतो भलताच, असें ह्मणतात ते काही खोटें नव्हे. ह्या खुळ्या कर्कटीने आपल्या विस्तृत शरीराचे पोषण व्हावे ह्मणून सहस्र वर्षे कष्टकर तप केले. पण विवे- काच्या अभावी ती सूक्ष्म सूयी एवढी झाली. आता जिला उदरच नाहीं ती खाणार काय ? त्या मूर्ख निशाचरीने उपायाचे चितन केले हे खरें, पण पुढील अपायाकडे लक्ष्य पोचविले नाही. बरोबरच आह निरर्थक बुद्धिमानास पूर्वापर (मागचा पुढचा) विचार कोठून सुचणार ? श्वामाच्या योगाने तोंडापुढे धरिलेला आरसा जसा मलिन होतो त्याप्रमाणे स्वार्थ- परायण लोकाची बुद्धि, विचार करण्यास सामर्थ्य असूनही, मलिन होते असा अनुभव येतो. त्या राक्षसीच्या चित्तात स्त्राविषयीं दृढ अनुराग उद्भवल्यामुळे, विशाल स्वरूप सोडून सूचीच्या आकाराचे होणे. यासारखे महामरणही तिला सुखरूप वाटले. एका वस्तूमध्ये अतिशय आसक्त झाल्याकारणानेही प्राण्यास जर इतकी विषमगति भोगावी लागते तर अनेक विषयासक्ताची काय दुर्दशा होत असेल याविषयी केवल अनु- मानच केले पाहिजे अहो या राक्षसी तृष्णेच्या अधीन होऊन या राक्षसीने आपला अत्यत प्रिय देहही कसपटाप्रमाणे टाकिला. एकाच वस्तूचा अतिशय ध्यास लागला ह्मणजे सर्व सदद्धि व विवेक नष्ट होतात. त्या कर्कटीस एका जिह्वेची तृप्ति करण्याची इच्छा होऊन तिचे सर्व लक्ष्य तिकडेच वेधल्याकारणाने तिला आपल्या देहाचा नाशही कळला नाही. साराश एका वस्तूत आसक्त झालेल्या प्राण्यास नाशही मुख देतो. या न्यायाने शरीररहित व सूच्याकार गक्षसीही सतुष्ट झाली. असो; ती दुसरी जीवसूचिका-आयसी सूचीशी सलग ( अगदी मिळा--