या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

___... २८३ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ७८. . शक्तीने सशरीरी होऊन तू आपले स्वरूप आहास दाखीव. चेंगट प्राण्यास काही मिळत नाही. उलट योग्य कर्म सत्वर न केल्यामुळे त्याची हानि होते." राजाचे हे गभीर व शहाणपणाचे भाषण ऐकून प्रकट होण्याकरिता ती राक्षसी मोठ्याने हसली व ओरडली. काही वेळाने त्याना तिचें तें भयकर शरीरही दिसले. अधकारास लाजविणारी ती तिची अग काति, अग्नीशी स्पर्धा करणारे ते नेत्र, उभारलेले ते तिचे राठ केस. भाल्याच्या अग्रासारखे तीक्ष्ण दात, सुपासारखे कान व नारळीच्या झाडा- सारखे उच शरीर पाहून त्या दोघा वीराना आश्चर्य वाटले. यक्ष, राक्षस, पिशाच यासही तिचे भय वाटणे अगदी साहजिक होते. पण राजा व मत्री याना तिचे यत्किचित्ही भय वाटले नाही. ते पूर्वीप्रमाणेच तिच्या- पुढे निर्भयपणे उभे राहिले. त्याचे चित्त मुळीच क्षुब्ध झाले नाही. कारण सत्य व मिथ्या याचे परीक्षण करण्याची ज्यास सवय लागली आहे त्या चित्तास कधी मोह होत नाही. असो, स्वशरीराने प्रकट झालेल्या त्या कर्कटीस मत्री ह्मणाला-अगे राक्षसि, तूं खरोखरच जर मोठी असशील तर तुला नुसत्या एका शब्दानेच प्राप्त होणाऱ्या आहाराविषयी इतका क्रोध करणे व आव घालणे शोभत नाही. कारण अशा उसन्या अवसा- नावरून तू मोठी आहेस, असें आह्मीं मुळीच समजणार नाही. शाति हे मोठेपणाचे लक्षण आहे, असे आह्मास आमच्या शिक्षकानी सागितले आहे. बरे तू क्षुद्र आहेस व त्यामुळे हा एवढा खटाटोप करीत असलीस तर त्याला आली मुळीच जुमानणार नाही, हे तू लक्षात धर. कारण क्षुद्राच्या क्रोधाला किवा शिव्याशापाना भीक न घालण्याइतके धैर्य आमच्या ठायी आहे. यास्तव तू आपली ही सर्व गडबड सोड व आपला स्वार्थ साधून घे. सुज्ञ लोक आपला इष्ट विषय टाकून इतरत्र प्रवृत्त होत नाहीत. हे अबले, तुझ्यासारख्या शेकडों मशकापुढेही आमचे धैर्य डगमगणार नाही. तू जर व्यवहारचतुर असशील तर स्वच्छ बुद्धि व युक्ति याच्या योगाने आपले हित करून घेशील. यास्तव मी तुला आणखी एकदा सागतों की, तुला काय पाहिजे ते साग. याचकाची प्रार्थना आझी स्वप्नामध्येही अमान्य करीत नाही. राघवा, राजाप्रमाणेच मंत्र्यांचेही तें धैर्यशाली भाषण ऐकून ती निशाचरी मनात विचार करू लागली की. कायहो हा यांचा शुद्ध आचार व त्यामुळे केवढे हे याचे धैर्य. हे आपले