या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ८०. ३९१ अधिष्ठान असल्यामुळे त्यांच्यामध्ये थोडासुद्धां वास्तविक भेद नाही. ज्ञानें- द्रियांस ज्ञानशक्ति व कमेंद्रियांस कर्मशक्ति देणारें तें चैतन्य प्रत्यक्ष आहे व त्यांचा विषय न होणारे ते अप्रत्यक्षही आहे सद्रूप चेता ह्मणजे द्रष्टाच दृश्याच्या आकाराचा होतो. पण कड्याचा भास होत असेपर्यंत सोन्याचा भास जसा जणुं काय काही होतच नाही त्याप्रमाणे दृश्याचा भास जोवर होत असतो तोवर त्या परमात्म-कलेचे जणु काय भानच होत नाही. एवढ्यासाठींच दृश्यरूपाने त्याची कल्पना न केल्यास किंवा कल्पिलेल्या त्या दृश्यास न पाहिल्यास केवल निर्मल, व शुद्ध ब्रह्मच अवशिष्ट रहाते. तो अणु चिदश सर्वरूप असल्यामुळे सद्रूप, दुर्लक्ष्य असल्यामुळे असत्-रूप, चेतनरूप असल्यामुळे चेतन व चैतन्याचा अविषय असल्यामुळे अचित् आहे. हे जग मृगजळाप्रमाणे, आकाशात भासणाऱ्या नगराप्रमाणे किंवा स्वप्नातील हत्तीप्रमाणे मिथ्या आहे. तेव्हा त्यात वास्तविक विषयता कोठून असणार ? जग हे दीर्घ स्वम आहे. त्यामुळेच स्वमात पाहिलेल्या पदार्थाप्रमाणे त्याला सत् , किंवा असत् यातील काहींच ह्मणता येत नाही. तस्मात् जगाच्या मिथ्या- त्वाचा वारवार व दीर्घ अभ्यास करावा. झणजे त्याच्या मिथ्यात्वाची भावना दृढ होऊन अविद्येचा नाश झाल्यावर पारमार्थिक ब्रह्माचा साक्षा- त्कार होईल व त्यामुळे पुनरपि ससारात पडावे लागणार नाही. स्वात्मचमत्कारामुळेच बुद्धीस भासणारे पदार्थ पृथक असल्यासारखे वाटतात. पण आत्मसत्ता सर्वव्यापी असल्यामुळे वस्तुतः तिन्याहून काही भिन्न नाही. एकच वीज वृक्षाहून पृथकही आहे व अपृथक्ही आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म जगाहून पृथकही आहे व अपृथकही आहे. अर्थात् वस्तुतः " एकमेवा- द्वितीय" असताना भिन्न दृष्टि व भिन्न अवस्था याच्या योगाने ते पृथक् व अपृथक् भासतें. बीजात असलेला वृक्ष अगदीच अल्प ( सूक्ष्म) असतो. यास्तव त्याची तेथील स्थिति आकाशतुल्य असते. त्याचप्रमाणे ब्रह्मामध्ये असणारे जग अतिसूक्ष्म असते. पण त्याला आत्मा पहातो व त्या साक्षीच्या रूपाहून त्याचे निराळे भान होत नाही. यास्तव त्याची स्थिति चैतन्यरूप आहे असो, हे राक्षसि, तुझ्या सर्व प्रश्नाचे थोडक्यांत एकच उत्तर असे आहे. शात, समस्त, एक, अज, अनादि, अनत, निष्कल, निरिच्छ, माया व मायाकार्य यानी रहित, वस्तुतः एक