या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. वैराग्यप्रकरण-सर्ग २१. अपराध करवितो व त्या बरोबरच मनुष्याच्या ससारातील भावी दुःखाचे वी पेरून ठेवितो. अनेक विषयाचा लोभ, अनेक इच्छा पूर्ण करून घेण्याचे सामर्थ्य, रगेल चित्तवृत्ति व स्त्रियाविषयींची असह्य कामना याच्या योगाने तरुण पुरुप व्याकुळ होऊन जातो. अशा प्रसगी कुमारावस्थेत कष्टाने सपादन केलेल्या सद्विद्येचा चागला उपयोग होतो. पण दुर्दैवामुळे तिचा लाभ झालेला नसल्यास अज्ञान, अविवेक, दारिद्य, अनेक व्यसने व पशु- बल याच्या तावडीत सापडलेल्या प्राण्याची फार देना होते. या अवस्थेतमनास आपल्या अधीन ठेवणे व सहज दोषास थारा न देणे या सारिखें परम पवित्र कृत्यच नाही. ते करणाऱ्या पुरुषास किवा स्त्रीसच धीर हे नाव शोभते. या तारुण्यामुळे जे नष्ट होत नाहीत तेच चिरजीव होत. ही अवस्था फार दिवस रहात नाही हे खरे, पण थोड्याशा अवकाशातही ती अनर्थ करू शकते. ह्मणून मी तिचा इतका तिरस्कार करितो. अभिमानादि सर्व दोषाची यौवनावस्था ही सुपीक भूमि आहे. या प्रसगी रजोगुणाचेच प्राधान्य असते, व त्यामुळे अनेक चिता व सकल्प क्षणोक्षणी उद्भातात. पण जे मूढ अशा या तारुण्याचे अभिनदन करितात त्यास पुढे मोठा पश्चा- त्ताप होतो. या योवनरूपी अरण्यातून जे सुखाने पार पडतात तेच महात्मे या लोकी पूज्य होत, असे माझे निश्चित मत आहे. विनयादि सात्त्विक-शीलसपन्न पुरुषास त्याचे सहज व सुखाने उल्लंघन करता येते, हे खरे; पण सात्त्विक पुरुप जगामध्ये फार निपजत नाहीत. ह्मणून मी या दोषाने भरलेल्या तारुण्याची इतकी निदा करीत आहे २०. सर्ग २१-पुरुषास प्रत्यक्ष नरक देणाऱ्या स्त्रियाची निदा, या सर्गात रामाने केली आहे भगवन् , मी आताच ज्याचे वर्णन केले त्या तारुण्यामध्ये, स्त्री हा पदार्थ, अति प्रिय वाटतो. पण त्यात काय काय भरलेले असते याचा कोणी लपट पुरुष विचार करितो काय ? नाही. देहाचे वर्णन करिताना त्यातील अमगल पदार्थाचा नामनिर्देश मी केलाच आहे. पण विषयाधास विष्ठाही अमृत असल्याचा भास कसा होतो याचे-स्त्री वरील प्रेम हे उदाहरण आहे. मासाच्या गोळ्यावर लुब्ध होणाऱ्या व आपल्या स्वार्थास विसरणाऱ्या मनुष्यास, मनुष्य हे नांव तरी कसे योजावें, ह्मणून मोठा विचार पडतो. तरुण स्त्रीच्या पुष्ट अवयवांस पाहून ज्याच्या शरीरात