या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ बृहद्योगवासिष्ठसार. मद सचार करितो व त्यामुळे जो मांसाशी क्रीडा करण्यास उद्युक्त होतो त्याचे पौरुष कितपतसे टिकते हा प्रश्नच आहे. तरी पण एवढी गोष्ट निःसशय आहे की स्त्री हा पदार्थ पुरुषाचा परिणामी घात करणारा आहे. कारण तो त्यास पशु बनविण्यास, त्याला नरकात लोटण्यास व त्याच्या सर्व पुरुषार्थाचा नाश करण्यास साक्षात्कारण होतो. अविचारामळे पुरुष स्त्रीच्या नेत्र-मुखादि ज्या ज्या अवयवाकडे पाहून इतका मोहित होत असतो तो तो अवयव अनेक दोषांनी भरलेला आहे, हे त्याच्या त्या- वळी ध्यानात येत नाही. हर, हर, स्वामिन् , मोहाचे केवढे बल हे ? नव्या रक्तमासामुळे जे शरीर काल मऊ, तुळतुळित, मुदर व भोग्य वाटत होते तेच आज प्राणवायूच्या अभावी लाकडासारखे कठिण, स्वडबडीत, करूप व स्पर्श करण्यासही अयोग्य वाटते. पण यात खरे रहस्य काय आहे याचा, या मोहामुळेच मोठ्या विचारी पडितासही प्रसगी बोध होत नाही. छी, छी., धिक्कार असो या स्त्रीला ही पुरुपाची वैरीण आहे, पुरुषार्थाचा भयकर प्रतिबध आहे व दुःखाचे निमित्त आहे. मला अशा त्या स्त्रीचे दर्शनही नको. [महाराज, मी स्त्री या वस्तूचा द्वेष करितो, अमे आपण समजू नये. तर स्त्री या पुरुषाच्या भोग्य पदार्थाचा मी तिरस्कार करीत आहे, असे समजावे. कारण परुषाप्रमाणे तीही या सृष्टीतीलच एक पदार्थ आहे व ईश्वराने निर्मिलेल्या वस्तूचा निष्कारण तिरस्कार करणे चागले नव्हे. पण तो पदार्थ पुरुपाच्या मनास विकार उत्पन्न करणारा व त्यामुळेच परिणामी दुःख देणारा असल्यामुळे त्या भोग्य वस्तूची निदा करावी लागते. खरोखर पहाता अमुक वस्तु भो- गाच्या उपयोगी आहे किवा नाही, हे ठरविणे त्या वस्तूच्या अधीन नसते, तर तें या ठरविणाऱ्या पुरुषाच्या( भोक्त्याच्या )च हाती असते. या- स्तव भोग्य वस्तु जरी पुरुषाच्या अनर्धास कारण होत असली तरी त्यात तिचा काही एक दोष नसतो. पण आझा व्यवहारी लोकास आपला दोष दुसऱ्याच्या माथी मारण्याची सवयच लागलेली असते व त्यामुळे हा असा प्रमाद घडतो. किंवा आह्मी मूर्ख आहो, हे तर ठरलेलेच आहे, पण स्त्री-इत्यादि पदार्थ आमच्या मूर्खपणाच्या अतिरेकास कारण होतात ह्मणून आली त्याची इतकी निदा करितो, असे समजावे. साराश येथील स्त्रीनिन्दा स्त्री या व्यक्तीस उद्देशून केलेली नाही. तर स्त्री हा एक भोग्य-