या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. उत्पचियकर-सर्ग ९४. ११५ असल्यास ब्रह्मादि लोकांची व त्यातील उत्तम भोगाची. इच्छा त्यास अवश्य असते. त्यामुळे या कल्पांतील त्याचा प्रथम जन्म शमादि गुण व भोग- वासना या दोन्ही परस्पर विरोधी गुणांनी युक्त असतो व त्यामुळे त्याच जन्मांत तो पुरुष ज्ञानास योग्य होत नाही. तर दहा-पाच जन्म भोग मोगून त्यांच्या विषयी पूर्ण वैराग्य उत्पन्न झाले झणजे मग तो ज्ञानसंपन्न च मुक्त होतो. असो; आतां ससत्त्वा या नांवाची तिसरी जीवजाति सागतों. नानाप्रकारच्या मुखदुःखादि फलांवरून पूर्वकल्पातील पुण्यापुण्याचा तर्क करविणारी व क्रमाने सत्त्वोत्कर्ष होता होता शेंकडों जन्मानी, मोक्षास पात्र होणारी अशी जी या कपातील जाति (जन्म) ती ससत्त्वा होय. चमत्कारिक संसार-वासनेने व्यवहार करणारी, प्राक्तन कल्पातील संचित बहु दुष्कर्मामुळे उद्भवलेल्या दुर्वासनेने युक्त व त्यामुळेच सहस्र जन्मांनी मोक्ष देणारी अशी जी जीवजाति ती अवमसत्त्वा या नावाची चवथी उपाधि आहे. पाचवी अत्यंत तामसी जातिही अधम सत्त्वेप्रमाणेच संसारवासना व दुष्कर्मजन्य दुर्वासना यानी युक्त असून शिवाय या कल्पांत स्था प्राण्यास मोक्ष मिळणे शक्य नसते. राजसी या नांवाची सहावी जाति आहे. ती पूर्वकल्पातील वासनानुसारी असते व तिच्या योगाने या कल्पात दोन तीन जन्मानींच मनुष्यादि जन्म प्राप्त होतो. पण त्यानंतरही कर्मानुरूप स्वर्ग-नरकादि फल प्राप्त होते. व मोक्ष सदिग्ध असतो. या राजस जातीमध्येच दुःखानुभव झाल्याकारणानें वैराग्यादि सपत्तीची प्राप्ति होऊन ज्ञानयोग्यता देणारा जन्म समीप आल्यास तिलाच मुमुक्षु मोक्ष-योग्या असें ह्मणतात, पण मी तिला राजस-सात्विकी असें झटले आहे. पण तीच जर मानुषा तिरिक्त थोडेसे यक्ष-गधर्वादिकाचे जन्म देऊन प्राण्यास मोक्षमाक् करणारी असेलर तिला राजसराजसी मणावें. आता नववी जीवजाति सागतों राजसतामसी हे तिचे नाव आहे. वरील राजसराजसीच जाति जर शमर जन्मानी मोक्ष-भागिनी होणारी असेल तर तिला राजसतामसी ह्मणावें व तीच जर सहस्र जन्मानीही मोक्ष देण्यास समर्थ होणारी नसेल तर तिला राजसात्यततामसी हे नाव द्यावे. एकामागून दुसरा, दुसन्यामागून तिसरा अशारीतीने अनेक जन्म घेऊन त्या कल्पात मुक्त होणान्या प्राण्याच्या जन्मास तामसी जीवजाति झणतात. दानव, राक्षस, पिशाच इत्यादि