या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सगे ९६. ४२७ तोच अहकार आहे. त्याच्यापासून प्रद्युम्नाख्य मन होते. त्याच्यापासून भनिरुद्धनामक बुद्धि उद्भवते, असे ह्मणतात. सारांश, येणेप्रमाणे योगी, माहेश्वर, नाकुल इत्यादि वादी निरनिराळ्या कल्पना करतात. पण त्या सर्वांचा उद्देश एकच. आपापल्या बुद्धीप्रमाणे ते सर्व परमात्म-तत्त्वाचा निर्णय करण्याकरितांच प्रयत्न करीत असतात व त्यांच्या त्यांच्या निर्ण- याप्रमाणे त्यास फलही मिळते. वस्तुत त्या सर्व विवेकी पुरुषाचे प्राप्य स्थान एकच आहे पण परमार्थाचे अज्ञान व विपरीत भावना याची योगाने ते परस्पर विवाद करीत सुटतात. विचित्र कल्पनाशक्तीने ते सर्व आपापल्या मार्गाची रमणीय प्रशसा करितात. ह्मणजे निरनिराळ्या मार्गानी एकाच झाडाखाली येऊन विश्राति घेत असताना वाटसरू जसे आपापल्या मागांची प्रशसा करितात तसाच हा सर्व प्रकार आहे. पण त्यांच्या त्या कल्पना व्यर्थ आहेत. स्नान, दान, आदान (ग्रहण) इत्यादि करणारा पुरुष जसा भिन्न भिन्न क्रियाचा कर्ता होतो त्याप्रमाणे मनच मनन, स्मरण, अहकरण, दर्शन इत्यादि क्रिया करीत असतांना मन, चित्त, अहकार इत्यादि नावास पात्र होते. चित्तच हे सर्व आहे, असा थोड्या विचाराती अनुभवही येतो. चित्तरहित पुरुष एकाद्या वस्तूस पहात असला तरी तो तिला पहात नाही. ह्मणजे अवधान नसल्यास डोळ्यापुढचा पदार्थही दिसत नाही. एकादा रम्य शब्द ऐकून, पुत्रादिकास आलिंगन देऊन, दर्शनीय वस्तु पाहून, व सुगधी पदार्थाचा वास घेऊन सचित्त पुरुषासच आनंद होतो आणि अनिष्ट वस्तूंचा अनुभव आला असता मनासह असलेल्या पुरुषासच विषाद वाटतो. सर्व रूपांच्या ज्ञानाचें कारण प्रकाश आहे. त्याचप्रमाणे सर्व पदार्थाच्या अनुभवाचे कारण मन आहे. ज्याचे चित्त मी बद्ध आहे या भावनेने युक्त असतें तो बद्ध होतो व ज्यास मी मुक्त आहे असा अनुभव येत असतो तो मुक्त होतो. एवढ्यासाठीच वाद्यास, आपापल्या वासनेप्रमाणे, मन जड आहे किंवा चेतन माहे, इत्यादि जो अनुभव येत असतो तो बरोबरच आहे. मन जेव्हा बद्वितीय ब्रह्माकार होते तेव्हा ससार लीन होतो व ते जेव्हां चचल व त्यामुळेच मलिन होते तेव्हा संसाराचे कारण होते. माणि असल्या विक्षिप्त व मलिन मनामुळेच भ्रांतीने जगाचा उद्भव होतो. साराश, हे रामचदा, केवल चैतन्यमय मनही संसाराचे कारण होत नाही