या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ९७. १२९ श्रीराम-गुरुवर्य, आपल्या सांगण्यावरून हे सर्व ब्रह्माडपटल मनापा. सृनच उत्पन्न झाले आहे व तें जगच मनाचे कर्म आहे, असें मी समजलों. श्रीवसिष्ठ-होय, तूं अगदी बरोबर समजला आहेस. प्रकाशस्वरूप आत्म्याचे ज्ञान न होण्याचे कारण त्याचे अज्ञान आहे व त्यामुळे ब्रह्मरूप अशा या जगात मनच जगद्रूप झाले आहे. ते कोठें मनुष्यरूपी, कोठे देवरूपी, कोठे दैत्यरूपी, कोठे यक्षरूपी, कोठे गधर्वरूपी, व कोठे किन्नर- रूपी झाले आहे. नाना आचार, नाना नभोभाग, नाना पुरें व नगरें इत्यादिकाच्या रूपाने मनच विस्तारले आहे, असे मला वाटते. हा सर्व शरीर समूह पृथ्वीतील तृण, काष्ठे, लता याच्या सारिखाच आहे. यास्तव पृथि- वीचे तत्त्व जाणण्याची ज्याची इच्छा असेल त्यास तृणादिकाचा विचार करून जसा काही लाभ होत नाही तर पृथ्वीचाच विचार करावा लागतो त्याप्रमाणे शरीराचा फारसा विचार न करिता आझांस मनाचाच विचार केला पाहिजे. दीर्घविचाराने कर्ता व कर्म याचे स्वरूप मनच आहे, असा दृढ निश्चय झाला ह्मणजे परमात्माच अवशिष्ट रहातो. तो सर्वांतर्यामी आत्मा सर्वाइन निराळा, सर्वत्र असणारा व सर्वांचा आधार आहे. त्याच्या कृपेनेंच मन इतस्ततः धावण्यास व अनत कल्पना करण्यास समर्थ होते. मन जसे कर्म आहे तसेच ते शरीराचे कारणही आहे. जन्म, मरण, वृद्धि, इत्यादि विकार मनालाच होतात. आत्म्याचे ते गुण नव्हेत. विचार करू लागले असता ते ( मन ) लय पाक्तें व त्याच्या लयानेच परम कल्याण होते. परम कल्याण ह्मणजे मोक्ष (संसार बधातून सुटणे) हे तुला ठाऊक आहेच. 'कर्मयुक्त मन' या नावाचा क्षय झाला असतां जीव मुक्त झाला असें ह्मणतात. तो पुनः जन्मास येत नाही. श्रीराम-भगवन् , आपण सात्त्विक, राजस व तामस असे तीन प्रकारचे प्राणी व विशेषतः मानव असतात, असे सागता व सदसद्प मन त्यांचे मख्य कारण आहे, असें ह्मणतां. पण कूटस्थ (निर्विकार ) चिन्मात्रस्वभाव अशा ब्रह्मापासून हे जगद्रूपी आश्चर्य निर्माण करणारे मन कसें उद्भवणार ? कारण ब्रह्म बुद्धिरहित आहे. विचारपूर्वकच सृष्टि होत असते व मननावाचून बुद्धीचा अध्यवसाय (निश्चय ) हा व्यापार होत नाही, हे जगप्रसिद्ध आहे. ह्मणून मनाच्या पूर्वी बुद्धि शाली, असेही समतां येत नाही. तेव्हां या मापल्या सिद्धांताची उपपत्ति कशी लागणार