या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३. उत्पत्तिप्रकरण-सर्ग १०२, १०३. ४४३ प्राण्याचा हा मनोदेह वारवार मरणरूपी वस्त्राने आच्छादित होत असतो तेव्हा या वंचकाविषयी उगीच का शोक करावा पूर्व काल व पूर्व देश यास सोडून गेल्याने आत्म्याचा नाश होतो, असें कसे ह्मणता येईल ? देहा- प्रमाणे आत्म्याचा नाश होत असतो, असे कोणालाही प्रत्यक्ष दिसत नाही. किवा कोणत्याही प्रमाणाने दाखवितां येणे शक्य नाही. यास्तव, बा रघु- राया, पख फुटल्यावर पक्ष्याचे लहान पिलु अतरिक्षात उडून जाण्याविषयी उत्सुक होऊन जसे आपले घरटें सोडिते त्याप्रमाणे तू"अह"ही खोटी वासना टाक ही मानसी शक्तीच इष्ट व अनिष्ट विषयामध्ये क्रमाने प्रेम व द्वेष याच्या योगाने प्राण्यास बद्ध करीत असते. ही अविद्येच्या विलासरूप असल्यामुळे स्वतः अविद्या आहे. ही दुरत (कष्टाने नाश पावणारी) आहे. प्राण्यास दुःख देण्याकरिताच ही उत्तरोत्तर वृद्धि पावते. हिच्या रूपाचे ज्ञान होई पर्यंत ही हे असन्मय जग पसरून दाखवीत असते. भावना हेच हिचे स्वरूप आहे व त्या( स्वरूपा )चा क्षय विचाराने होत असतो. ही मानस- शक्ति दुखाचें मूळ असल्याकारणाने तिचा नाश सर्वास इष्टच आहे व एकदा महा प्रयासाने मनोनाश सपादिला ह्मणजे पुनः अनर्थाचा उद्भव होत नाही. कारण मनाचे यथार्थ स्वरूप जोवर समजलेले नसतें तोवर ते हे इद्रजाल पसरते व त्याचे स्वरूप समजले झणजे त्याच्या हातून काही होत नाही. साराश याप्रमाणे मनच दीर्घकाल जगरूपाने नाचतें व शेवटी आपणच विद्यारूप होऊन आपला नाश करून घेते. विद्येच्या योगाने आत्मवध नामक नाटक करण्यात ते मोठे चतुर आहे. अहो हे चित्त केवल आपल्या नाशाकरिताच आत्म्यास पहाते. कारण मूर्खास आपला प्राप्त झालेला नाश कसा समजणार ? असो; मनोनाश कोणत्या उपायाने होईल असे ह्मणून उपाय शोधणा-या विवेक्यास हे मनच आपल्या नाशाचा उपाय सुचविते. विवेकयुक्त मन आपला संकल्प- विकल्पात्मक स्वभाव सोडून ब्रह्माच्या आकाराचे ( स. सर्वव्यापी, अति विस्तृत ) होते. अर्थात् त्याचा आत्मसाक्षात्काररूप परिणाम होतो. मनो- नाश हाच परम पुरुषार्थाचा लाभ व सर्व दुःखाचा उच्छेद होय. यास्तव रघुनाथा, तूं मनोनाशाविषयी प्रयत्न कर. त्याच्या बाह्य व्यापाराविषयी मुळीच प्रयत्न करावयास नको. पण असें न करिता या मनाची उपेक्षा केल्यास मात्र मोठा अनर्थ ओढवेल.